ओढे-नालेसफाईला शेवाळवाडीत सुरुवात

ओढे-नालेसफाईला शेवाळवाडीत सुरुवात

फुरसुंगी, पुढारी वृत्तसेवा; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या शेवाळवाडी गावातील ओढ्या- नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

साफसफाईअभावी ओढ्या-नाल्यांमध्ये कचरा अडकून शेवाळवाडीत अनेक घरांमध्ये तसेच गावातील महादेव मंदिरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या ठिकाणची तातडीने सफाई करण्यात यावी, अशी मागणी येथील माजी सरपंच राहुल शेवाळे यांनी केली होती.

या आशयाचे पत्र हडपसर क्षेत्रीय अधिकारी प्रसाद काटकर साहेब यांना दिले होते. या मागणीची दखल घेत पालिका कर्मचार्‍यांनी जेसीबी मशिनच्या मदतीने येथील ओढे-नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात केली आहे. या वेळी माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे, राहुल शेवाळे, दिगंबर शेवाळे, सुरेश शेवाळे, अलंकार खेडेकर, पालिका अधिकारी श्रीयुत काळे उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news