इंद्राणी बालन फाउंडेशनकडून ‘घट्टे ट्रस्ट’ला रुग्णवाहिका भेट..

इंद्राणी बालन फाउंडेशनकडून ‘घट्टे ट्रस्ट’ला रुग्णवाहिका भेट..
Published on
Updated on

पुणे : प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या इस्लामपूर येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशनकडून रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या मदतीबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचे ट्रस्टकडून आभार व्यक्त करण्यात आले. आठ ते नऊ वर्षांपासून डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून इस्लामपूर भागात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. ट्रस्टकडून राजारामबापू पाटील संस्थेला नुकतीच एक रुग्णवाहिका देण्यात आली. तसेच राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीमार्फत अनेक मेडिकल कॅम्प आयोजित केले जातात.

कॅम्पमध्ये सहभागी रुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणखी एका अ‍ॅम्ब्युलन्सची गरज होती. त्यासाठी ट्रस्टने युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे तशी मागणी केली. त्यांची गरज ओळखून आणि त्यांचे सामाजिक कार्य पाहून पुनीत बालन यांनी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिकेसाठी अर्थसाह्य केले. त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने बालन यांचे आभार मानण्यात आले.

रुग्णाला वेळेत उपचार मिळाले, तर तो निश्चितपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी रुग्णवाहिका अत्यंत अत्यावश्यक आहे. आरोग्यसेवेत डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद असून, या कार्यामुळेच त्यांच्या मागणीवरून इंद्राणी बालन फाउडेशनच्या माध्यमातून त्यांना रुग्णवाहिका देण्यात आली. या माधयमातून अधिकाधिक गरजू रुग्णांना मदत होईल, असा विश्वास आहे.

– पुनीत बालन, अध्यक्ष, इंद्राणी बालन फाउंडेशन

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news