बाणेर परिसरातील या अनधिकृत टेरेस हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.
बाणेर परिसरातील या अनधिकृत टेरेस हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.

अनधिकृत हॉटेल्सवर पालिकेचा हातोडा!

Published on

बाणेर : पुढारी वृत्तसेवा: औंध, बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अनधिकृत टेरेस हॉटेल व बारवर पालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. बांधकाम विकास विभागाकडून बाणेर परिसरातील 5 अनधिकृत हॉटेल शेडवर कारवाई झाली असून, या कारवाईत किती सातत्य राहणार, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. परिसरातील बहुसंख्य हॉटेलला पालिकेतर्फे परवानगी देण्यात आलेली नसून, अनधिकृतरीत्या हे हॉटेलचालक आपला व्यवसाय चालवत आहेत.काही दिवसांपूर्वी टेरेसवरील एका हॉटेलला औंध येथे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीमुळे हॉटेल पूर्ण जळून खाक झाले होते.

या आगीनंतर परिसरामध्ये चालू असलेल्या अनधिकृत हॉटेलचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विकास विभाग-3 कडून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करण्यात आली आहे. गॅसकटरच्या साहाय्याने 1400 अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात आली आहेत. जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता संग्राम पाटील, संदेश कुळवमोडे, गंगाप्रसाद धमदिमे, आरेखक शिवराज तसेच बांधकाम विभागाचे कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच पोलिस यांनी मिळून ही अतिक्रमण कारवाई केली.

कारवाईत सातत्य राहणार का?
औंध, बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये अनेक टेरेसवरती मोठ्या थाटात अनधिकृत हॉटेल व बार सुरू आहेत. यामुळे पार्किंग समस्या, रात्रीचा गोंधळ, वाद-विवाद आदी घटना घडत आहेत. याबाबत अनेक वेळा स्थानिक सोसायटीतील नागरिकांनीही तक्रारी केल्या आहेत; परंतु कारवाई होत नसल्याचे लक्षात येत आहे. सध्या झालेली कारवाई कितपत योग्य ठरणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news