

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (Airport Authority of India) स्वतंत्र बोर्डच्या सदस्या माधवी संजय नाईक यांनी नुकतीच पुणे विमानतळालगत सुरू असलेल्या नव्या टर्मिनल इमारतीची पहाणी केली. यावेळी त्यांनी येथे सुरू असलेल्या कामाची अद्ययावत स्थिती पाहिली, त्यामुळे पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारतीच्या कामाला आता वेग येण्याची शक्यता आहे.
विमानतळ प्राधिकरणाच्याअंतर्गत विमानतळ प्रशासनाची कामे चालतात. नाईक यांनी नव्या टर्मिनलच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नवीन टर्मिनल प्रकल्पाचे महाप्रबंधक प्रकल्प गगन मलिक, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके व अन्य विमानतळ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा