पुणे : वाहतूक पोलिसांच्या मदतीला आणखी साडेसहाशे वॉर्डन | पुढारी

पुणे : वाहतूक पोलिसांच्या मदतीला आणखी साडेसहाशे वॉर्डन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेकडून यापूर्वी वाहतूक पोलिसांच्या मदतीला सातशे वॉर्डन देण्यात आले होते. मात्र, आणखी वॉर्डनची गरज असल्याचे पोलिस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून वाहतूक पोलिसांच्या मदतीला आणखी 650 वॉर्डन देण्यात येणार आहेत. शहरात प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असली तरी तेथे वाहतूक पोलिसांची उणीव भासत आहे.

त्यामुळे महापालिकेने पोलिसांना मदत करण्यासाठी वॉर्डन देण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या विविध भागात रस्त्याची, पावसाळी गटार, उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी झालेला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नुकतीच महापालिका व वाहतूक पोलिसांची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये महापालिकेने 650 वॉर्डन देण्याचे मान्य केले आहे. यामध्ये सोलापूर रस्ता, नगर रस्ता, गणेशखिंड रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता या प्रमुख रस्त्यांसह मध्यवर्ती भागातील गर्दीच्या रस्त्यांचा समावेश आहे.

महापालिका व वाहतूक पोलिसांची नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका वाहतूक पोलिसांना 650 वॉर्डन देईल, असा निर्णय घेतला आहे.

विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

हेही वाचा

नगर : गुंडेगाव पंचायत समिती गणातील गावे तहानलेली

कोकण रेल्वे मार्गावर आता पुराचा संदेश देणारी यंत्रणा

कोकण रेल्वे मार्गावर आता पुराचा संदेश देणारी यंत्रणा

Back to top button