पुणे: पती दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नीने केला खून

पुणे: पती दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नीने केला खून
Published on: 
Updated on: 

यवत (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पत्नीने दारुड्या पतीचा खून केल्याची घटना केडगाव-चौफुला (ता.दौंड) येथे घडली असून सुमारे आठ दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी मयत संतोष पवार (रा. केडगाव चौफुला ता. दौंड. ) हा दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे त्याची पत्नी पल्लवीने डोक्यात, हातावर लाकडाने मारहाण केली. त्यामध्ये तो जखमी झाला. त्यानंतर संतोष पवार याला चक्कर येत असल्याने पुढील उपचारासाठी ससुन हॉस्पिटल, पुणे येथे नेले होते. परंतु, डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना हा आकस्मिक मृत्यू नसून खून असल्याचा संशय आला. पुढील तपासात मयत संतोष पवार याची पत्नी पल्लवीने केलेल्या मारहाणीमुळे पती संतोष पवार याचा मृत्यू झाला, असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार पत्नी पल्लवी पवारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खून झालेल्या संतोष पवार याचा भाऊ सचिन पवार यांनी फिर्याद दिली आहे. तर या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे करत आहेत, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news