महिलेचा पाठलाग करून विनयभंग; तरुणाला अटक

महिलेचा पाठलाग करून विनयभंग; तरुणाला अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बोलणे बंद केल्याच्या रागातून तरुणाने महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना कोंढव्यात घडली. तिच्याकडील मोबाईलही त्याने हिसकावून नेला. याप्रकरणी सुहास राधाकृष्ण नवले (वय 36, रा. गंगाधाम) याला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचे अश्लील फोटो नातेवाईकांना पाठविण्याची व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उंड्री परिसरात घडली. याबाबत 35 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व सुहास नवले एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपासून महिलेने सुहाससोबत बोलणे बंद केले होते. कारण सुहास याचे इतर मुलींसोबतदेखील संबंध असल्याची माहिती तिला मिळाली होती.

त्यामुळे तिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. त्याचा राग आल्याने मंगळवारी सकाळी सुहासने महिलेला रस्त्यात गाठले. तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news