यावर्षी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पुढाकाराने आणि क्रीडा विभागाच्या सहकार्याने प्रथमच मिनी ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेतील खेळाडूंना प्रमाणपत्र देण्याबाबत क्रीडा विभागाशी यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मात्र, अद्यापही प्रमाणपत्रे मिळाली नसतील तर पुन्हा एकदा क्रीडा विभागाशी संवाद साधू.– नामदेव शिरगावकर,सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनराज्यात प्रथमच मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन झालेले आहे. या स्पर्धेतील प्रत्येक विजेत्या खेळाडूला स्पर्धेच्या ठिकाणीच प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आलेले आहे. त्यातूनही काही खेळाडूंचे प्रमाणपत्र राहिले असेल तर त्यांनी क्रीडा विभागाशी संपर्क साधावा. त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देऊ.– सुहास दिवसे,आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय