नगर : टाकळीमियाँमध्ये पावसाने हानी

नगर : टाकळीमियाँमध्ये पावसाने हानी

वळण : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुक्यात आज (शनिवारी) सायंकाळी झालेल्या पहिल्याच वादळी पावसात मुसळवाडी, टाकळीमिया परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे पडली. विजेच्या तारा तुटून विद्युत प्रवाह खंडित झाला. अनेक लहान, मोठ्या व्यवसायिकांच्या दुकानची होर्डिंग, शेड उडून गेली. टाकळीमियॉ येथील मुख्य चौकात लेंडी ओढ्याजवळ असलेल्या चार ते पाच टपर्‍या ओढ्यात पडल्या. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही, मात्र आर्थिक हानी झाली. सुमारे अर्धा तास झालेल्या वादळी पावसाने अनेकांची दाणादाण केली.

शनिवारी सायंकाळी सव्वा पाच ते सहाच्या दरम्यान मुसळवाडी, टाकळीमिया परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली. फांद्या तुटून रस्त्यावर इतरत्र पडल्या. विद्युत वाहक तारा तुटून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक बंद झाली. काही भागातील रात्रभर विद्युत प्रवाह खंडित राहिला. मुसळवाडीत दत्तात्रय एकनाथ चोथे यांच्या राहत्या घरावर घरासमोरील लिंबाचे झाड घरावर पडले. गावातील मुख्य मंदिराजवळ असलेले वडाचे मोठे झाड पडले. भाऊसाहेब माने यांचे जांभळीचे झाड पडले. सोपान म्हसे यांची गाईचे शेड दूरवर पडले. टाकळीमिया- मुसळवाडी रस्त्यावर पाच विद्युत वाहक तारा तुटल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news