पुणे : पत्नी चाकू घेऊन झोपलीय…वाचवा हो!

पुणे : पत्नी चाकू घेऊन झोपलीय…वाचवा हो!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पत्नी बेडरूममध्ये चाकू घेऊन झोपल्यामुळे घाबरलेल्या पतीने थेट पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून जबाब नोंदविला.

माहेरच्या लोकांनी पतीला मारले

पोलिसात तक्रार केल्याचा राग आल्याने पत्नीने माहेरच्या लोकांच्या मदतीने पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पतीच्या घरातील दोन लॅपटॉप, सोने आणि घड्याळ असा 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, असे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात पत्नी, मेहुणी, मेहुणा, सासू-सासरे, निखिल शर्मा आणि अशोक मरकडे (सर्व रा. औरंगाबाद) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 32 वर्षीय पतीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पतीचे पत्नीबरोबर नेहमी घरगुती वाद होत होते. या वादातून अनेकदा त्यांची सासरच्या लोकांशीही भांडणे झाली होती. त्यांच्या सासरचे लोक नेहमी संसारात हस्तक्षेप करीत होते. तसेच फिर्यादीच्या आईस तुच्छ वागणूक देत होते. दरम्यान, त्यांची पत्नी 8 जुलै 2020 रोजी बेडरूममध्ये चाकू घेऊन झोपली होती. या वेळी फिर्यादीने पोलिस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला.

दोघांनाही पोलिस स्टेशनला बोलावल्यावर फिर्यादीने पत्नीविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांच्या आईस शिवीगाळ केली. फिर्यादीस मारहाण केली. यानंतर घरातील 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक साळवे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news