पुणे : कुरुलकरच्या मोबाईलचा आयएमईआय नंबर कुठेय?

पुणे : कुरुलकरच्या मोबाईलचा आयएमईआय नंबर कुठेय?
Published on: 
Updated on: 

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विकास संस्थेचा (आर अँड डी ई) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या जप्त केलेल्या मोबाईलमधून डेटा प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा ट्रान्सफर पोर्ट खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. नेमका कुरुलकरकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल कोणता त्याचा आयएमईआय नंबर कुठे आहे, अशी विचारणा बचाव पक्षाच्या वतीने बुधवारी न्यायालयात करण्यात आली. बुधवारी कुरूलकर याच्या जामीन अर्जावर तसेच व्हाईस लेअर सायकॉलॉजिकल अ‍ॅनालिटीकल टेस्टच्या अर्जावर सुनावणी होती. परंतु, जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी एटीएसने वेळ मागितल्याने यावरील सुनावणी आता 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.

तत्पूर्वी बचाव पक्षाचे केश गानू यांनी युक्तिवाद केला की, कनेक्टिव्हिटी फेल्युअरमुळे कुरुलकरचा मोबाईल डेटा विश्लेषणासाठी गुजरातच्या विशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवायचा आहे. असे सरकारी वकील आणि तपास अधिकारी सांगत आहेत. इथेच विसंगती दिसत आहे. हा कुरुलकरचाच मोबाईल आहे की नाही याची ओळख पटणे आवश्यक असल्याने मोबाईलचा आयएमईआय नंबर मिळावा, असे बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले.

विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्यासमोर जामिनाची तसेच टेस्ट संदर्भात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी व्हाइस लेयर सायकॉलॉजिकल चाचणीची आवश्यकता नमूद करताना कुरुलकरच्या मोबाईल डेटाचे विश्लेषण करायचे असून, एक मोबाईल गुजरातमधील विशेष न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तर, दुसर्‍या मोबाईलची दुरुस्ती करावी लागणार आहे. कुरुलकर तपासात सहकार्य करीत नसल्याने तपासाची दिशा ठरविण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची असल्याचे नमूद केले होते. तसेच या चाचणीसाठी कुरुलकर याच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे फरगडे यांनी युक्तिवादात नमूद केले होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news