पुणे : नागरिक-कार्यकर्त्यांमध्ये महापालिकेसमोर वाद | पुढारी

पुणे : नागरिक-कार्यकर्त्यांमध्ये महापालिकेसमोर वाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध प्रश्नांसाठी महापालिकेसमोर आंदोलन सुरू असताना नागरिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्याची घटना बुधवारी घडली. यामुळे पालिकेसमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण, पार्किंग व्यवस्था, कचराकुंड्या, दुर्गंधी, नदीतील प्रक्रिया न केलेले सांडपाणी, नदीकाठची झाडे तोडणे, नदीपात्राच्या नावाखाली नदीपात्रात काँक्रीट टाकून मानवी जीवनासाठी धोकादायक प्रकल्प उभारणे यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नागरिकांनी महापालिकेसमोर बुधवारी आंदोलन करत पालिकेला घेराव केला.

या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. त्यावेळी आंदोलकांपैकी एकाने माईकवर काँग्रेसने भाकरी भाजू नये, अशी घोषणा दिली. त्यामुळे काँग्रेसचे नेते व पदाधिकारी आक्रमक झाल्याने कार्यकर्ते व त्या आंदोलक नागरिकांमध्ये वादावादी झाली. यामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

हेही वाचा

सलग सुट्ट्यांमुळे ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला

एसटी कामगार संघटनेचा ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

उरुळी देवाची, फुरसुंगी गावांचा आज फैसला!

Back to top button