पुणे शहरात गुरुवारी या भागातील पाणीपुरवठा बंद

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेचे पर्वती जलकेंद्र पंपिंग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी-वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत-पंपिंगविषयक, स्थापत्य आणि तातडीची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (26 मे) बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. 42, 46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

लष्कर जलकेंद्र पंपिंग भाग :

लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी इत्यादी.

चतु:शृंगी-एसएनडीटी-वारजे जलकेंद्र परिसर :

भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भूगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हायवे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरूड, डेक्कन जिमखाना परिसर, जय भवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकात नाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, पोलिस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग :

मुळा रोड, खडकी, एमईएस, हाय एक्स्प्लोझिव्ह फॅक्टरी, हरिगंगा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news