वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठ्यात पाणी

वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठ्यात पाणी
Published on
Updated on

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा :उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आळे व बेल्हे येथील वन विभागाच्या अखत्यारीतील वनक्षेत्रात (जंगल) असणार्‍या पाणवठ्यांमध्ये वन विभागाच्या वतीने पाणी भरण्याचे काम सुरू झाले आहे. पूर्व भागातील आळे वनपरिक्षेत्रच्या हद्दीमध्ये पिंपरी पेंढार, वडगाव आनंद, पादीरवाडी, आळे, संतवाडी कोळवाडी, राजुरी येथे व बेल्हे वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील गुंजाळवाडी, बेल्हे, रानमळा, गुळुंचवाडी, आणे, पेमदरा, शिंदेवाडी, नळावणे, पारगाव तर्फे आळे, पिंपरी कावड, मंगरुळ औरंगपूर येथे वन विभागाचे सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर वनक्षेत्र असल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

या जंगलांमध्ये बिबट्या, तरस, कोल्हे, लांडगे, उदमांजर, ससे, मोर, रानडुक्कर, हरीण आदी प्राणी व पक्ष्यांचा अधिवास आढळून येतो. शिंदेवाडी, नळवणे या भागातील जंगलातं हरीण, तर राजुरी परिसरात रानडुक्कर आहेत. आळे व बेल्हा वनपरिक्षेत्रात असलेल्या वनक्षेत्रात बारा पाणवठे असल्याची माहिती वनपाल संतोष साळुंखे व वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली. पिंपरी कावळ व शिंदेवाडी येथील वनक्षेत्रात पाझर तलाव असल्याचे वनरक्षक राजेंद्र गाढवे यांनी सांगितले.

हे पाणवठा व पाझर तलाव उन्हाळ्यात वन्यप्राणी व पक्ष्यांची तहान भागविण्यास वरदान ठरत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची भटकंतीही सुरू झाली आहे. या वर्षी पावसाचे सरासरी प्रमाण कमी राहिल्याने वनक्षेत्रात पाण्याची उपलब्धतता कमी झाली असून, पाणवठेही कोरडे पडले आहेत. वन विभागाच्या वतीनेही असणार्‍या या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. यापुढेही या पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी भरण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news