शेतकर्‍यांनी नवनवीन उत्पादनांची कास धरावी : चंद्रकांत पाटील यांचे आवाहन | पुढारी

शेतकर्‍यांनी नवनवीन उत्पादनांची कास धरावी : चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

दौंड : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी नवनवीन उत्पादनांची कास धरावी व अभ्यासपूर्वक शेती करावी. ड्रोनच्या साह्याने खते व औषधांची फवारणी करावी,असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. भाजपच्या वतीने दौंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 16) करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. कृषी प्रदर्शनाचे आयोजक भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा, माउली चौरे, जालिंदर कामठे, बाळासाहेब गावडे, सनी सोनार आदींसह पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी या वेळी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, शेतकर्‍यांनी नवनवीन प्रकल्पांची माहिती घेऊन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करावा. पावसाचा प्रत्येक थेंब आपण अडवला पाहिजे. भूजलपातळी वाढण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. सध्या उसाला चांगला भाव मिळत आहे, हे केवळ मोदी आणि शहांमुळेच शक्य झाले. काळे म्हणाले, गेली नऊ वर्षे मी शासनाचा कोणताही लाभ न घेता कृषी प्रदर्शन भरवत आहे. शेतकरी हाच आमचा केंद्रबिंदू आहे. या वेळी उत्कृष्ट उत्पादन व नवनवीन प्रयोग केल्याबद्दल शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी नगरसेवक नंदू पवार यांनी केले.

हेही वाचा 

Back to top button