Wanwadi Ward 18 Development Plan: वानवडी–साळुंखे विहार प्रभागातील प्रश्न सोडवणार; नगरसेवक साहिल केदारी यांचा निर्धार

वाहतूक, पाणी, कचरा, अतिक्रमण व भैरोबानाल्याच्या दुर्गंधीवर उपाययोजनांचा आराखडा
Wanwadi Ward 18 Development Plan
Wanwadi Ward 18 Development PlanPudhari
Published on
Updated on

पुणे: प्रभाग क्रमांक 18 वानवडी-साळुंखे विहारमधील वाहतूक, पाणी, कचरा, अतिक्रमणाचे प्रश्न सोडविण्यासह भाजी मंडईसाठी नवीन जागा शोधायची आणि भैरोबानाल्याच्या पाण्याच्या उग््रा वासामुळे होत असलेल्या त्रासातून नाल्यालगतच्या सोसायट्यांमधील नागरिकांची सुटका करायची, या दूरदृष्टिकोनातूनच यापुढील काळात प्रभागात काम करणार असल्याचा विश्वास काँग््रेासचे नवनियुक्त नगरसेवक साहिल केदारी यांनी व्यक्त केला. साहिल केदारी यांनी दै. ‌‘पुढारी‌’च्या कार्यालयाला भेट देत प्रभागातील विविध समस्यांवर काढण्यात येणारा तोडगा आणि करण्यात येणाऱ्या नवीन कामांविषयी माहिती दिली.

Wanwadi Ward 18 Development Plan
Pune Municipal Election Analysis: बावधन-भुसारी कॉलनी प्रभाग १० मध्ये भाजपचा दणदणीत विजय

केदारी म्हणाले की, बाळासाहेब शिवरकरांचे निकटवर्तीय शिवाजीराव केदारी यांनी साधारण 1974 पासून काँग््रेास पक्षाबरोबर वानवडी-कॅन्टोन्मेंट परिसरात काम करायला सुरुवात केली. 1992 मध्ये पहिल्यांदा त्यांना काँग््रेासने पुणे महापालिकेत संधी दिली. त्यानंतर 1997 मध्ये संबंधित प्रभागात महिला आरक्षण सुटले व माझी आई भावनाताई केदारी नगरसेवक झाली, तर पुन्हा 2002 मध्ये वडिलांना नगरसेवक होण्याचा मान मिळाला. मी सेंट व्हिन्सेंटमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नेस वाडियामधून बीकॉम केले, तर सिंहगड कॉलेजमधून एमबीए आणि भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमधून एलएलबी केले आहे. हे करीत असतानाच 1996 पासून मी राजकारणात प्रवेश केला. यूथ काँग््रेासमध्ये 2010 आणि 2014 मध्ये कॅन्टोन्मेंट विधानसभाध्यक्ष म्हणून निवडून येऊन काम पाहिले.

Wanwadi Ward 18 Development Plan
Pudhari Rise Up Women Athletics Tournament Pune: ‘राईज अप’ पुणे जिल्हास्तरीय महिला ॲथलेटिक्स स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

2018 साली पुणे शहराचा ओबीसी अध्यक्ष म्हणून, तर 2021 ला महाराष्ट्र प्रदेश ओबीसीचा उपाध्यक्ष म्हणून काम केले. हे करीत असतानाच वानवडी-साळुंखे विहारमधील प्रभागात नागरिकांची विविध कामे करण्यावर भर दिला. लोकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड काढण्यापासून ते नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेण्यापर्यंत विविध कामांवर भर दिला. कोरोना काळात नागरिकांना लस उपलब्ध करून देणे, रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे आदी कामे केली. प्रभागात वडील शिवाजीराव केदारी आणि आई भावनाताई केदारी यांचे काम होते. त्यांना मतदारांनी संधी देखील दिली होती. त्यांच्याकडे पाहूनच प्रभागातील नागरिकांची विविध कामे करीत सन 2017 मध्ये पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढवली.

Wanwadi Ward 18 Development Plan
Pudhari Rise Up Women Kabaddi Tournament Pune: ‘राईज अप’ पुणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी सीझन-4 नेहरू स्टेडियमवर रंगणार

परंतु, अवघ्या 400 मतांनी पराभव झाला. तरी या पराभवाने न खचता नागरिकांशी संपर्क करीत त्यांच्या विविध समस्या सोडवत राहिलो. प्रभागात ज्या विविध सोसायट्या आहेत. त्या सोसायट्यांमधील नागरिकांसोबतचा दांडगा संपर्क, यामुळे पक्ष कोणता आहे, याचा विचार न करता माझा चेहरा पाहून मला लोकांनी मतदान केले. या प्रभागात माळी आणि मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्यांच्याबरोबरच मुस्लिम, ख्रिश्चन, बोहरी यांसह अन्य जातींचे मतदार आहेत. त्यांनी सर्वांनीच जातीच्या आधारावर मतदान न करता चेहरा पाहून मतदान केल्यामुळे माझा विजय सुकर झाला. समाजातील विविध घटकांची ही बांधिलकी कधीही न विसरता त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे देखील केदारी यांनी स्पष्ट केले.

Wanwadi Ward 18 Development Plan
NCP Politics Pawar Family Meeting: पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र... विद्या प्रतिष्ठान येथे आजही बैठक; युगेंद्र पवार देखील उपस्थित

प्रभागात ही कामे करणार

  • प्रभागात वाहतुकीची फार मोठी समस्या आहे ती सोडवणार

  • पाणी कमी दाबाने येते. त्यावर उपाय शोधून पाणीपुरवठा सुरळीत करणार

  • वेस्ट कचऱ्यांचे मॅनेजमेंट करणार

  • रस्त्यावरील खड्डेदुरुस्ती आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करणार

  • भाजी मंडईसाठी नवीन जागा शोधणार

  • भैरोबानाल्याच्या दुर्गंधीमुळे होणाऱ्या त्रासातून नाल्यालगतच्या सोसायट्यांमधील नागरिकांची सुटका करणार

  • जांभूळकर मळ्यातील अंडरपासच्या प्रश्नावर मार्ग काढणार

  • गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही लावणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news