Pudhari Rise Up Women Athletics Tournament Pune: ‘राईज अप’ पुणे जिल्हास्तरीय महिला ॲथलेटिक्स स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

70 शाळांमधील 2000 हून अधिक खेळाडूंचा सहभाग; कै. बाबूराव सणस मैदानावर चौथा हंगाम सुरू
Pudhari Rise Up Women Athletics Tournament
Pudhari Rise Up Women Athletics TournamentPudhari
Published on
Updated on

पुणे: दै. ‌‘पुढारी‌’ आयोजित पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना यांच्या सहकार्याने महिलांच्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. समस्त पुणेकर, क्रीडाप्रेमी, स्पर्धक, पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सध्या पुढारी राईज अप पुणे महिला स्पर्धेचा चौथा हंगाम सुरू आहे. कै. बाबूराव सणस क्रीडा मैदानावर बुधवारी (दि. 4) ॲथलेटिक्स स्पर्धेचे उद्घाटन झाले.

Pudhari Rise Up Women Athletics Tournament
Pudhari Rise Up Women Kabaddi Tournament Pune: ‘राईज अप’ पुणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी सीझन-4 नेहरू स्टेडियमवर रंगणार

या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष ॲड. अभय छाजेड, व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष बांदल, संचालक ज्ञानेश्वर चोरघे, ‌‘वेंकटेश बिल्डकॉन‌’च्या संचालिका पीयूषा आसबे, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्‌‍स ट्रिनिटीचे खजिनदार विनोद जाधव, दै. ‌‘पुढारी‌’चे निवासी संपादक सुनील माळी, मार्केटिंग हेड संतोष धुमाळ, माजी तांत्रिक अधिकारी बाप्टिस्ट डिसोझा, माउंट कार्मेल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संदीप घोलप, स्पर्धेचे समन्वयक हर्षल निकम आदी उपस्थित होते.

Pudhari Rise Up Women Athletics Tournament
NCP Politics Pawar Family Meeting: पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र... विद्या प्रतिष्ठान येथे आजही बैठक; युगेंद्र पवार देखील उपस्थित

या वेळी श्रीफळ वाढवून तसेच माउंट कार्मेल हायस्कूलच्या बँड पथकाने मार्च पास करीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी हवेत फुगे सोडून आणि खेळाडूंना शपथही देण्यात आली. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग््राामीण भागातून खेळाडूंनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेत मुळशी, लोणावळा, इंदापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आदी भागांतील तब्बल 70 शाळांमधून 48 क्रीडाप्रकारांसाठी 2000 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. सूत्रसंचालन प्रा. दिनेशकुमार पांडे यांनी केले.

या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरिच असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकेडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट हे आहेत. सहप्रायोजक म्हणून अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले आहे.

Pudhari Rise Up Women Athletics Tournament
Pune Rabies Dog Bite Death: पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने तरुणाचा रेबीजमुळे मृत्यू;दौंड तालुक्यात धक्कादायक घटना

दै. ‌‘पुढारी‌’ आयोजित राईज अप महिला ॲथलेटिक्स स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एखादी स्पर्धा सुरू करणे सोपे असते; परंतु त्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून सातत्य ठेवणे कठीण आहे. ‌‘पुढारी‌’सारख्या मोठ्या माध्यम समूहाने केवळ महिलांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे

दै. ‌‘पुढारी‌’ आयोजित या ॲथलेटिक्स स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सलग चार वर्षांपासून हे दैनिक स्पर्धा घेत असून, मुलींना स्पर्धेत मोफत प्रवेश देते, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. अलिकडच्या काळात स्पर्धा घेणे सोपी बाब राहिलेली नाही. परंतु, अशाप्रकारे प्रवेश फी न घेता, शिवाय रोख पारितोषिक देणारी दै. ‌‘पुढारी‌’ची ही एकमेव स्पर्धा आहे.

ॲड. अभय छाजेड, अध्यक्ष, पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना

Pudhari Rise Up Women Athletics Tournament
TET Result Controversy Maharashtra: टीईटी निकालावर वाद: चुकीच्या उत्तरांमुळे हजारो उमेदवार अनुत्तीर्ण?

केवळ महिलांसाठी आयोजित करण्यात येणारी दै. ‌‘पुढारी‌’ची ही एकमेव स्पर्धा असणार आहे. एखाद्या माध्यम समूहाने महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खूप छान उपक्रम राबवीत आहेत. स्पर्धेतील खेळाडूंची संख्या पाहता या स्पर्धेची व्याप्ती वाढावी.

पीयूषा आसबे, अध्यक्षा, वेंकटेश बिल्डकॉन

दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने केवळ महिलांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आत्तापर्यंत पुढारी आयोजित कुस्ती, जलतरण, बॅडमिंटन आदी स्पर्धांनाही भेट दिली होती. या सर्वच स्पर्धांत मुलींचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आजच्या ॲथलेटिक्सला मुलींचा सहभाग आणि त्यांच्यासमवेत आलेल्या पालकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. ‌‘पुढारी‌’च्या या उपक्रमाला कायम शुभेच्छा आहेत.

संतोष बांदल (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news