Pudhari Rise Up Women Kabaddi Tournament Pune: ‘राईज अप’ पुणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी सीझन-4 नेहरू स्टेडियमवर रंगणार

सब-ज्युनिअर, ज्युनिअर व खुल्या गटात चुरस; विजेत्यांना रोख बक्षिसे व ट्रॉफी
Rise Up
Rise UpPudhari
Published on
Updated on

पुणे: महिला खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दै. ‌‘पुढारी‌’च्या पुढाकाराने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ‌‘राईज अप : पुणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी सीझन-4 स्पर्धा‌’ शुक्रवारी दि. 6 फेबुवारीपासून नेहरू स्टेडियमवर रंगणार आहे.

Rise Up
Pune Rabies Dog Bite Death: पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने तरुणाचा रेबीजमुळे मृत्यू;दौंड तालुक्यात धक्कादायक घटना

खेळ आणि खेळाडूंच्या कौशल्याला दाद देण्यासाठी पुण्याच्या क्रीडाप्रेमींसाठी ही एक पर्वणी असणार आहे. ही स्पर्धा शुक्रवार दि. 6, शनिवार दि. 7 आणि रविवार दि. 8 फेबुवारी रोजी दररोज सायंकाळी 6 वाजल्यापासून नेहरू स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत सबज्युनिअर, ज्युनिअर आणि खुल्या, अशा तीन गटांत चुरस पाहायला मिळेल.

विजेत्या संघांना रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये खुल्या गटातील विजेत्या संघास 21 हजार रुपये व ट्रॉफी, ज्युनिअर गटातील विजेत्यास 15 हजार रुपये व ट्रॉफी, सब-ज्युनिअर गटातील विजेत्यास 11 हजार रुपये व ट्रॉफी, याशिवाय सर्व उत्कृष्ठ अष्टपैलू, प्लेअर ऑफ द डे अशा वैयक्तिक कौशल्यांसाठी विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Rise Up
TET Result Controversy Maharashtra: टीईटी निकालावर वाद: चुकीच्या उत्तरांमुळे हजारो उमेदवार अनुत्तीर्ण?

या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरिच असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट हे आहेत.

सहप्रायोजक म्हणून अदानी, तर असोसिएट पार्टनर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्‌‍स ट्रिनिटी, अमनोरा पार्क टाऊन, सपोर्टिंग पार्टनर पुणे महापालिका यांचे सहकार्य मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news