Pune Municipal Election Analysis: बावधन-भुसारी कॉलनी प्रभाग १० मध्ये भाजपचा दणदणीत विजय

कडव्या लढतीतही भाजपने 2017 प्रमाणे चारही जागा राखल्या
Election Analysis
Election AnalysisPudhari
Published on
Updated on

दीपक पाटील

पौड रोड: महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 : बावधन-भुसारी कॉलनीमध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात या ठिकाणी ओबीसीमधून किरण दगडे, सर्वसाधारण महिला अल्पना वरपे, रूपाली पवार तसेच पुरुषमध्ये सर्वसाधारण जागेवरून दिलीप वेडे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. परंतु, येथील महिला गटातील भाजपची माजी नगरसेविका श्रद्धा प्रभुणे-पाठक यांना उमेदवारी नाकारत नवीन चेहरा रूपाली पवार यांना उमेदवारी दिली.

Election Analysis
Pudhari Rise Up Women Athletics Tournament Pune: ‘राईज अप’ पुणे जिल्हास्तरीय महिला ॲथलेटिक्स स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

भाजपचे पॅनेल मजबूत झाल्याने विरोधी पक्षातून कोण निवडणूक लढवणार? याची प्रभागात उत्सुकता होती. राजकीय समीकरण लक्षात घेता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगरसेवक शंकर केमसे, माजी नगरसेविका जयश्री मारणे यांच्यासह अभिजित दगडे, सुजाता भुंडे यांना उमेदवारी देण्यात आली.

Election Analysis
Pudhari Rise Up Women Kabaddi Tournament Pune: ‘राईज अप’ पुणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी सीझन-4 नेहरू स्टेडियमवर रंगणार

राष्ट्रवादीचे पॅनेल मोठ्या मताधिक्याने निवडून यावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभागात रोड-शो देखील केला होता. भाजपच्या उमेदवारांनी मात्र केलेल्या विकासकामांवर प्रचारात भर दिला. त्यामुळे भाजपला 2017 प्रमाणे चारही जागा येथे राखता आल्या.

Election Analysis
NCP Politics Pawar Family Meeting: पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र... विद्या प्रतिष्ठान येथे आजही बैठक; युगेंद्र पवार देखील उपस्थित

ऐनवेळी ठाकरे शिंदे गटाने एकला चलोची भूमिका घेतल्याने त्यांचे देखील तीन उमेदवार रिंगणात होत, तर मनसेकडून तीन, काँग््रेास आणि शिवसेना ठाकरे गटातून एक-एक उमेदवार रिंगणात असल्याने प्रभागात मोठी चुरस दिसून आली. भाजपसह इतर पक्षांतील निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या 16 होती.

Election Analysis
Pune Rabies Dog Bite Death: पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने तरुणाचा रेबीजमुळे मृत्यू;दौंड तालुक्यात धक्कादायक घटना

मी निवडून येणार म्हणणारे ठरले अपयशी

कोथरूडमधील प्रभाग क्रमांक 10 व 11 च्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिल्या फेरीपासून भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. मी निवडून येणारच, म्हणणाऱ्या उमेदवारांना घाम फुटला होता. समोर दिसणारे दृश्य आणि कानावर पडणारे मतांचे आकडे ऐकून भाजप मतांच्या सुनामीपुढे आपला टिकाव लागणार नाही, हे समजून अनेकांनी मतमोजणी केंद्र सोडून घरचा रस्ता धरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news