Otur Pickup Driver Dangerous Driving: 'नागीण डान्स' करत पिकअपची जीवघेणी स्टंटबाजी; ओतूर पोलिसांनी चालकावर ठोकला थेट गुन्हा

पुष्पावती नदी पुलाजवळ भरधाव वेगात वेडीवाकडी वाहनचालना; पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी कारवाई
Otur Pickup Driver
Otur Pickup DriverPudhari
Published on
Updated on

ओतूर: रस्त्यावरून पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा बेदरकार पद्धतीने पिकअप वाहन चालवत, वाहनात "नागीण डान्स"सदृश वेडीवाकडी कसरत करणाऱ्या चालकाविरुद्ध ओतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेफाम चालकांना चांगलीच चपराक बसली आहे.

Otur Pickup Driver
Pune Airport International Connectivity: पुणे विमानतळावरच होणार इमिग्रेशन-कस्टम्स प्रक्रिया; परदेश प्रवासासाठी हब अँड स्पोक मॉडेलची तयारी

ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शाम जायभाये व पोलीस हवालदार नामदेव बांबळे हे नियमित पेट्रोलिंग करत असताना डिंगोरे येथील आमले शिवार वस्तीच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पावती नदीवरील पुलाजवळ ही घटना निदर्शनास आली.

Otur Pickup Driver
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा वाढता विळखा; चार महिन्यांत २२ रुग्ण, नगर रोड-वडगाव शेरी सर्वाधिक हॉटस्पॉट

यावेळी पिकअप गाडी चालक सौरभ संतोष भिसे (रा. डिंगोरे, ता. जुन्नर) हा भरधाव वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून वाहन (एमएच १४ एलबी ७४३५) चालवत होता. पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहनाला वेडीवाकडी वळणे देत "नागीण डान्स"सारखी धोकादायक कसरत करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Otur Pickup Driver
Pune Illegal Injection Sale: पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; पाच जण अटकेत, ५० मेफिवान इंजेक्शन जप्त

पोलिसांनी तत्काळ वाहन अडवून चालकाविरुद्ध ओतूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.

Otur Pickup Driver
Kesanand Solid Waste Management Project: केसनंद ग्रामपंचायतीत कचऱ्याचे आंदोलन; २.११ कोटींच्या घनकचरा प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावर संताप

बेपर्वाईने वाहन चालवून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहनचालकांवर ओतूर पोलिसांकडून यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news