Wagholi Elderly Couple Help: वाघोलीत 91 वर्षीय दाम्पत्याला समाजाचा आधार; मदतीचा ओघ सुरू

पुढारी’च्या वृत्तानंतर वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस पुढे सरसावले
Wagholi Elderly Couple Help
Wagholi Elderly Couple HelpPudhari
Published on
Updated on

वाघोली: उतारवयात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या 91वर्षीय आजीबाईंची हृदयस्पर्शी व्यथा दै. ‌‘पुढारी‌’ने नुकतीच मांडली. त्यानंतर वाघोली परिसरात मानवतेचा झरा वाहू लागला असून, समाजातील अनेक दानशूर व्यक्ती या वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

Wagholi Elderly Couple Help
Pune Yerwada Civic Meeting: येरवड्यात मोहल्ला कमिटी बैठकीवर नागरिकांचा संताप; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजी

वाघोली परिसरात राहणाऱ्या आजरबाई सध्या संघर्षमय जीवन जगत आहेत. त्यांच्या पतीला अर्धांगवायू झाला असून, औषधे घेण्याइतके पैसेही त्यांच्याकडे नाही. वाघोली पोलिस या वृद्ध दाम्पत्याला वेळोवेळी मदत करीत आहेत. याबाबत दै. ‌‘पुढारी‌’ने ‌‘खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन‌’ या आशयाचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्यात या दाम्पत्याचा उतारवयातील संघर्ष आणि वाघोली पोलिसांकडून त्यांना होणारी मदत याबाबत वृत्तांकन केले होते. त्यानंतर परिसरातील दानशूर व्यक्तींकडून या दाम्पत्याला मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

Wagholi Elderly Couple Help
Pune Book Festival: पुणे बाल पुस्तक जत्रेत उत्साह; कथा, विज्ञान आणि वायूसेनेचा अनुभव

सामाजिक कार्यकर्त्या मीना सातव पाटील यांनी पुढाकार घेत या दाम्पत्याला पुढील चार ते पाच महिने पुरेलइतके किराणा साहित्य देत मदतीचा हात पुढे केला आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील प्रकाश बाबूराव जाधव यांनी शेंगदाणे, चहा, साखर यांसह विविध जीवनावश्यक वस्तू या दाम्पत्याला दिल्या. स्वरूप गिरमकर यांनी औषधे, गोळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

Wagholi Elderly Couple Help
Pune Bagdogra Flight: पुणे–बागडोगरा थेट विमानसेवा सुरू; पर्यटनाला मोठी चालना

दरम्यान, वाघोली पोलिसांच्या सेवाभावी कार्याने या मदतीच्या साखळीला दिशा दिली. पोलिस हवालदार संभाजी बेंद्रे यांनी औषधोपचारासोबतच आजीबाईंना नऊवारी साडी देत देखील मदत करण्याचे आश्वासन दिले. जीके फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष संदीप कटके यांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला असून, आवश्यक ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Wagholi Elderly Couple Help
Pune Housing Project Issue: पुण्यात मॉन्टेरोजा प्रकल्पात घोटाळ्याचा आरोप; भोगवटा प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह

एकेकाळी आधारासाठी हतबल झालेल्या या आजीबाईंना आता समाजाचा खंबीर आधार मिळू लागला आहे. या वृद्ध दाम्पत्याला अजूनही मदत देणार असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले. मदतीचा ओघ पाहून या दाम्पत्याने दै. ‌‘पुढारी‌’चे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news