Pune Bagdogra Flight: पुणे–बागडोगरा थेट विमानसेवा सुरू; पर्यटनाला मोठी चालना

दार्जिलिंग, गंगटोक प्रवास सुलभ; पुण्याची ईशान्य भारताशी कनेक्टिव्हिटी मजबूत
Pune Bagdogra Flight
Pune Bagdogra FlightPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे विमानतळावर नुकताच पुणे-बागडोगरा थेट विमानसेवेचा शुभारंभ नुकताच पार पडला. या नवीन सुविधेमुळे आता दार्जिलिंग आणि गंगटोक, यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे जाणे अधिक सुलभ आणि वेगवान झाले असून, पुण्याची देशांतर्गत पर्यटन कनेक्टिव्हिटीही आणखी भक्कम होणार आहे.

Pune Bagdogra Flight
Pune Housing Project Issue: पुण्यात मॉन्टेरोजा प्रकल्पात घोटाळ्याचा आरोप; भोगवटा प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह

पुणे विमानतळावरून ही विमानसेवा संचालित केली जात आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील विविध पर्यटनस्थळाच्या कनेक्टिव्हिटीसाठी प्रवाशांना आता कनेक्टिव्हिटीसाठी मोठ्या शहरांमध्ये थांबण्याची गरज उरणार नाही. विमान क्र. 1248/1249 ची सेवा मंगळवार आणि शनिवार वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवस सुरू राहील. हे विमान पुण्यात दुपारी 12:25 वाजता दाखल होईल, तर परतीसाठी दुपारी 1:15 वाजता उड्डाण करेल.

Pune Bagdogra Flight
Pune Police Bribery: पुणे पोलिस दलात लाचखोरीचे ग्रहण; 3 अधिकारी जाळ्यात

पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाणारे पुणे हे शिक्षण, आयटी आणि संस्कृतीचे केंद्र आहे. तर दुसरीकडे बागडोगरा हे पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानले जाते. या थेट सेवेमुळे पुण्यातील हजारो विद्यार्थी आणि आयटी व्यावसायिकांना थेट ईशान्य भारताशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे. तसेच, या विमानसेवेमुळे फक्त पर्यटनालाच नव्हे, तर व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीलाही मोठी चालना मिळेल.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news