पुणे : पाषाण, बावधन भागात भवितव्य सोसायटीतील मतदारांच्या हाती

पुणे : पाषाण, बावधन भागात भवितव्य सोसायटीतील मतदारांच्या हाती
Published on
Updated on

मोहसीन शेख / विनोद माझिरे

बाणेर : प्रभागाची भौगोलिक रचना पाहता पूर्वी असलेला पाषाण, सुतारवाडी हा प्रभाग एकत्र आला आहे. या प्रभागात महापालिकेत नुकतेच समाविष्ट करण्यात आलेले बावधन बुद्रुक गाव व महापालिकेत असलेला काही बावधनचा भाग घेण्यात आला आहे. नव्या प्रभागात सोसायटी वर्गाचे प्रमाण मोठे असल्याचे लक्षात येते. यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत गावठाणाबरोबरच सोसायटी वर्ग कोणाकडे जाणार यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

पूर्वीचा प्रभाग क्रमांक नऊमधील पाषाण, सुतारवाडी व नवीन गावातील बावधन घेऊन हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सर्वच उमेदवार बाणेर बालेवाडी भागातील निवडून आल्यामुळे पाषाण सुतारवाडीला प्रतिनिधित्व नसल्यासारखे झाले होते. परंतु सध्याची प्रभागरचना पाहता पाषाण सुतारवाडी परिसरातील नागरिकांचे मतदान या प्रभागात निर्णायक ठरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोसायट्यांचे वर्चस्व

प्रभागामध्ये पाषाण गावठाण, सुतारवाडी गावठाण, बावधन गावठाण असा गावठाण भाग, तर लमाण तांडा हा वस्तीचा भाग आहे. हा भाग वगळता इतर भागांमध्ये सर्वत्र सोसायट्या पाहायला मिळतात. त्यामुळे सोसायट्यांची भूमिका या प्रभागात महत्त्वाची ठरणार असल्याचे लक्षात येते. अवघ्या काही मतांनी भाजपच्या पाषाणमधील उमेदवाराचा मागील निवडणुकीत पराभव झाला होता. असे असले तरी त्याआधी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची पकड होती. पुन्हा ही पकड निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कामाला लागले आहेत. प्रभागामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरून एखादा मोठा बदलही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोसायट्यांचा वर्ग जास्त असल्याने थोडासा कल भाजपकडे झुकत असला तरी महाविकास आघाडी झाल्यास भाजपाला फटका बसू शकतो. प्रभागात बावधनमधून विद्यमान नगरसेवक व सरपंच हे भाजपचे असल्याने त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

प्रभागांमधून भाजपकडून नगरसेवक किरण दगडे, राहुल कोकाटे, सरपंच पियुषा दगडे, सचिन दळवी, गोरख दगडे, सचिन पाषाणकर, रोहन कोकाटे, शिवम सुतार, स्नेहल महाडिक (सुतार), मंदार घुले, कल्पना घुले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, सूर्यकांत भुंडे, साधना बालम सुतार, अभिजित दगडे, योगेश सुतार, नीलिमा सुनील सुतार, दीपक दगडे, सविता दगडे, नीलेश दगडे, कुणाल वेडे, सुजाता भुंडे, अश्विनी दगडे. काँग्रेसकडून मंगेश निम्हण, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, दत्ता जाधव, वैमानिक मृणाल अजय निम्हण, पूजा दगडे, राजश्री जाधव, केतन कदम. शिवसेनेकडून संजय निम्हण, संतोष तोंडे, महेश सुतार, राहुल दुधाळे, नीलेश शंकर दुधाळे. मनसेकडून सुहास निम्हण, अशोक दळवी, मयूर सुतार, रेखा निम्हण, पांडुरंग सुतार, शिवम दळवी, स्वाती जाधव, विशाल डगळे. तर पक्ष नसलेल्यांमध्ये गौरी मेढेकर (कोकाटे) इच्छुक आहे.

अशी आहे प्रभागरचना

पाषाण, बावधन बुद्रुक, हाय एनर्जी मटेरियल लॅबोरेटरी, सुतारवाडी, मोकाई वस्ती, शिवनगर, पाषाण, पाषाणगाव, सोमेश्वरवाडी, एन. सी. एल. पार्ट, नेकलेस गार्डन, भारत इलेक्ट्रॉन ली., रामनगर, साई वेलोसिटी, पाषाण लेक, व्हिवा हॉलमार्क सोसायटी, गंगा लीजंड.

  • एकूण लोकसंख्या 58 515
  • अनुसूचित जाती 7801
  • अनुसूचित जमाती 1669

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news