

प्रभाग क्रमांक : 3 विमाननगर-लोहगाव-वाघोली
संतोष निंबाळकर, माऊली शिंदे, दीपक नायक
प्रभाग क्रमांक 3 मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या लोहगाव आणि वाघोली या गावांत मूलभूत सुविधा आणि विकासकामांबाबत सर्वत्र ‘आनंदी आनंदच’ आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रभागातील जुन्या हद्दीतही पावसाळ्यात पूरस्थिती, अपुरा पाणीपुरवठा, पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आदींसह विविध समस्या अद्यापही कायम आहेत. लोहगाव, वाघोली आजच्या आधुनिक युगात विकासापासून ‘कोसो दूर’ असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
लोहगाव बस स्थानक आणि आठवडे बाजाराचे स्थलांतर रखडल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. नाल्यांवरील अतिक्रमणे व नाले वळविल्याने पूरस्थिती निर्माण होते. काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तांनी या भागाला भेट देऊन समस्यांची पाहणी केली. त्यानंतरही परिसरातील कचऱ्याची समस्या कायम आहे. पाण्यासाठी नागरिकांना टँकरच्या
खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकामे, लष्कराच्या रेड झोनमधील शंभर व नऊशे मीटर हद्दीतील बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रभागातील जुन्या हद्दीतील जगदंबा सोसायटी, शुभम गार्डनिया, साई पार्क, विमाननगर, फिनिक्स मॉलजवळच्या परिसरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. विमाननगरमधील पदपथावर अतिक्रमणे व रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगची समस्या कायम आहे. वाघोली परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. क्रीडांगणे, जलतरण तलाव नाहीत.
अहिल्यानगर महामार्गावर स्काय वॉकची मागणी प्रलंबित असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उघड्यावरील कचऱ्यामुळे भटके श्वान व डुकरांची संख्या वाढली आहे. महत्त्वाच्या चौकातील व पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करणे गरजेचे आहे.
विमाननगर-लोहगाव-वाघोली या प्रभागात सोपाननगर, विमाननगर, बर्माशेल, संजय पार्क, लोहगावचा सुमारे 40 टक्के भाग तसेच वाघोलीचा नगर रस्त्याच्या डाव्या बाजूचा लोणीकंद गावापर्यंतचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे.
लोहगावमधील शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन, लोहगावचा पर्यटनस्थळ म्हणून विकास, वारकऱ्यांसाठी सुविधा, हरणतळे परिसर विकसित करणे आणि लोहगावच्या नागरी विमानतळाला श्री संत तुकाराम महाराजांचे नाव देणे, ही महत्त्वाची कामे रखडली आहेत. यामुळे विकास ठप्प झाल्याची प्रतिक्रया नागरिकांनी व्यक्त केली.
पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती
लोहगाव, वाघोलीतील कचरा समस्या
पाण्याच्या टाक्यांची कामे
पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत
पदपथ, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडी
रखडलेले डीपी रस्ते व मुख्य
रस्त्यांचे रुंदीकरण
समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी कधी?
लोहगाव, वाघोलीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
जुन्या हद्दीतील मुख्य व अंतर्गत रस्ते
विमाननगरमध्ये क्रीडांगणे, उद्यान व पाण्याची टाकी
विमानगरमधील सीसीडी चौकातील रस्त्याचे काम पूर्ण
वाघोलीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढली
वाघेश्वर व श्री प्रभू रामचंद्र
उद्यानाची निर्मिती
लोहगाव परिसरात पाण्याच्या टाक्यांची कामे चालू
सांडपाणी व जलवाहिन्यांची कामे चालू
वीस वर्षे रखडलेला कोणार्क सोसायटीचा रस्ता केला. तक्षशिला स्पोर्ट कॉम्प्लेक्स, शास्त्रीनगर, संजय पार्क येथे समाजमंदिर व नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीला निधी दिला. बर्माशेल येथे अत्याधुनिक जिम, विमाननगर येथे कम्युनिटी हॉल, यमुनानगर येथे दवाखाना, विमाननगरमध्ये तीन पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली.
राहुल भंडारे, माजी नगरसेवक फॉरेस्ट पार्क, तिरंगानगर,
विमाननगर-एचसीएमटीआर येथील रस्ते केले. कलवड, गुरुव्दारा, खेसे पार्क, बर्माशेल या ठिकाणी रस्ते, विद्युततारा भूमिगत केल्या. जलवाहिन्यांची कामे केली असून, भामा आसखेड प्रकल्पामुळे पाण्याची समस्या सुटली आहे. पूरस्थिती सोडवण्यासाठी पावसाळी वाहिन्या टाकल्या असून, अजून दीड कोटी निधीची मागणी केली आहे. पार्किंग इमारत व उद्यान विकसित करण्यासाठी निधी दिला आहे.
श्वेता गलांडे-खोसे, माजी नगरसेविका