Khadakwasla Green Development: खडकवासला तीरावरील वनराईनं भारावले दिल्लीचे पाहुणे धरणातील गाळातून उभारले शेतरस्ते व फळबागा

गाळमुक्ती उपक्रमामुळे 10 कि.मी.चा शेत रस्ता, बहरलेली झाडी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नतीकडे वाटचाल
Khadakwasla Green Development
Khadakwasla Green DevelopmentPudhari
Published on
Updated on

खडकवासला : खडकवासला धरण तीरावर ग्रीन थंब संस्थेच्या वतीने लोकसहभागातून स्थानिक भूमिपुत्रांसाठी तयार केलेले दहा किलोमीटर अंतराचे शेत रस्ते तसेच फळबागा, वनराईतील बहरलेली गर्द झाडी पाहून दिल्लीच्या पाहुण्यांसह सिंहगड, पानशेत भागातील नागरिक भारावून गेले.

Khadakwasla Green Development
Science Park Pune: पुणे जिल्हा परिषद उभारणार दोन सायन्स पार्क

दिल्लीतील टाटा लॅक्सी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सार्थ नायर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, परिसरातील नागरिकांनी सोमवारी (दि. 17) खानापूर, गोऱ्हे खुर्दमध्ये धरणातून काढण्यात आलेल्या गाळावर शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात आलेल्या शेतरस्ते, फळबागा, वनराई आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली.

खानापूरमधील मांडवी स्टॉप ते गोऱ्हे खुर्दपर्यंतच्या धरण तीरावरील पडीक दलदलीच्या ओसाड जागेवर धरणातून काढण्यात आलेला गाळ टाकून स्थानिक शेतकऱ्यांना शेतात वाहनाने ये- जा करता यावी, यासाठी दहा ते पंधरा किलोमीटर लांबीचा तसेच दहा ते पंधरा फूट रुंदीचा प्रशस्त रस्ता तयार करण्यात आला आहे.

Khadakwasla Green Development
Pune International Marathon: डिसेंबरमध्ये 39 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात मोठा बदल

तसेच, या परिसरात विविध देशी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांना शेती, फळबागा करण्यासाठी मोफत रोपे, माती देण्यात आली आहे. त्यामुळे शेत शिवारात टाकलेल्या धरणाच्या गाळमातीवर भाजीपाला, गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा आदी पिकांसह आंबा, काजू, नारळ, चिकू आदींच्या फळबागा बहरल्या आहेत.

खानापूरमध्ये खडकवासला धरण तीरावरील पडीक जमिनीवर तयार केलेला शेत रस्ता.

Khadakwasla Green Development
‌Pune Municipal Election: ’राष्ट्रवादी‌’ला 40 जागा देण्यास भाजपचा नकार

गेल्या पंधरा वर्षांपासून खडकवासला धरणातून गाळ काढण्यात येत आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता 30 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचा लाभ लाखो पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतीला होत आहे.

कर्नल सुरेश पाटील, अध्यक्ष, ग्रीन थंब संस्था

Khadakwasla Green Development
AI Dam Research Pune‌: ‘एआय‌’च्या साहाय्याने आता धरणांचे संशोधन!

धरण तीरावरील शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते. रस्ता झाल्याने ट्रॅक्टरसह सर्व वाहने थेट शेतात जात आहे. शेतातून बाजारपेठत शेतीमाल नेला जात आहे.

प्रियांका प्रमोद जावळकर, उपसरपंच, खानापू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news