Vdyanand Bapat PC: तुम्ही माझ्यावर का फोकस करताय... मी कोणीच नाही! माझे मुद्दे खोडून काढा; विद्यानंद बापटांचे पुन्हा खुलं आव्हान

Vdyanand Bapat PC
Vdyanand Bapat PCpudhari
Published on
Updated on

Vdyanand Bapat PC: पुण्यातील ध्वनी प्रदुषणावर आपले परखड मत मांडणाऱ्या विद्यानंद बापट या तरूणावर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर विद्यानंद बापट यांनी आज याबाबत प्रत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

बुद्धी प्रमाण्यावादाचे पुरस्कर्ते असलेल्या विद्यानंद बापट यांनी आजच्या पत्रकार परिषदेत तुम्ही विद्यानंद बापट यांच्यावर फोकस करू नका म्हणजेच माझ्यावर फोकस न करता माझे मुद्दे खोडून काढा. मी कोणीच नाहीये. तुम्ही माझे मुद्दे खोडून काढा असं खुलं आव्हान डीजे समर्थकांना दिलं.

Vdyanand Bapat PC
Vidyanand Bapat: '७ वर्षांपूर्वी पुण्यात आलेल्यांनी....', बापटांच्या भूमिकेवर रुपाली ठोंबरे पाटील भडकल्या; सोशल मीडियावर राडा

विद्यानंद बापट यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ते एखादी संघटना वगैरे सुरू करणार का याबाबत देखील विचारणा झाली. त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेतील घटनेनंतर सिटीझन अॅक्टिव्हजम वाढीला लागलं आहे. त्यामुळं हा लढा तसाच चालू राहील. याला संघटनात्मक स्वरूप द्यायचं हे पाईपालाईनमध्ये आहे त्यामुळं सध्या त्याबाबत काही सांगू शकत नाही असं उत्तर दिलं.

याचबरोबर विद्यानंद बापट यांनी ते जर जिवंत राहिले तर पुण्यातील मोर्चाला उपस्थित राहणार असं देखील म्हणाले. सहा सप्टेंबरचा मोर्चा हा नागरिकांना काढला आहे. त्यामुळं हे आंदोलन आता तेच पुढे घेऊन जात आहेत.

पोलीस संरक्षणाबाबत बोलताना बापट यांनी आपण संवैधानिक लोकशाहीत राहतो त्यामुळं पोलिस आणि लॉ एन्फोर्समेंटला त्यांना त्यांचे कर्तव्य करायचं आहे ते त्यांचे कर्तव्य करत आहेत. मी देखील त्यांच्यावर फार ताण येणार नाही याची काळजी घेतोय.

Vdyanand Bapat PC
Vidyanand Bapat: संतोष चव्हाणवर धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल; बापटांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात, तपासात धक्कादायक माहिती

विद्यानंद बापट यांना तुमचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे का असा प्रश्न देखील पत्रकारांनी विचारला त्यावर विद्यानंद बापट यांनी असा बोलवता धनी असला तरी फरक काय पडतो. तुम्ही माझ्यावरती का फोकस करताय. माझा बोलवता धनी कोणी नाहीये. मात्र माझं म्हणणं आहे की माझा मुद्दा खोडून काढा. मी तुम्हाला १०० वेळा सांगतोय की माझे मुद्दे तुम्ही खोडून काढा ते तुम्हाला खोडून काढता येत नाहीत. तुम्ही अॅड होमिन लॉजिकल फॅलसी कमीट करताय. त्यामुळं तुमचा प्रतिवाद हा दखल घेण्याच्या पात्रतेचा देखील नाहीये. त्याचं खंडन करणं सोडून द्या ते हास्यास्पद वाटतंय. तुम्ही माझे मुद्दे तार्किक पद्धतीनं खोडून काढा मी ते मागे घेतो.

Vdyanand Bapat PC
Vidyanand Bapat: विद्यानंद बापटांना पोलिसांकडून संरक्षण; आरोपीला उद्या कोर्टात हजर करणार; सीपींचा थेट इशारा, काय म्हणाले?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news