Vidyanand Bapat: विद्यानंद बापटांना पोलिसांकडून संरक्षण; आरोपीला उद्या कोर्टात हजर करणार; सीपींचा थेट इशारा, काय म्हणाले?

Vidyanand Bapat Attack Pune Police Commissioner Amitesh Kumar: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, आरोपीला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Vidyanand Bapat Pune Police Commissioner
Vidyanand Bapat Pune Police CommissionerPudhari
Published on
Updated on

Vidyanand Bapat Attack Pune Police Commissioner Amitesh Kumar: डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. बापट यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली असून, या प्रकरणातील आरोपीला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी न्यायालयाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, “या घटनेकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहिले आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची पोलिसांची भूमिका आहे.” बापट यांना पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली असून, पुढील आदेशापर्यंत परिस्थितीनुसार त्यांना सुरक्षा दिली जाणार आहे.

गणेश मंडळांनी घटनेचा निषेध केला

या घटनेनंतर पुण्यातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिसांनी चर्चा केली. सर्व गणेश मंडळांनी या घटनेचा एकमताने निषेध केला असून, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी मंडळांसोबत चर्चा करण्यात आली आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

बापट यांच्याविरोधात तक्रार; मात्र सध्या गुन्हा दाखल नाही

दरम्यान, विद्यानंद बापट यांच्या विरोधात काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून तक्रार अर्ज प्राप्त झाल्याची माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली. मात्र, तक्रारीतून सध्या गुन्हा दाखल करण्यासारखी कोणतीही बाब आढळून आलेली नाही. त्यामुळे बापट यांच्याविरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात येणार नसल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्तांसमोर बाचाबाची करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले. यावेळी आयुक्तांनी संबंधित कार्यकर्त्यांना मर्यादेत राहण्याची तंबी दिली. “सीन क्रिएट करण्याऐवजी पोलीस आयुक्त कार्यालयात या आणि चर्चा करा,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावल्याची माहिती आहे.

Vidyanand Bapat Pune Police Commissioner
BJP on Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ भाजप नेते गणेश बीडकर मैदानात; म्हणाले, पुणेकरांच्या...'

डीजेसाठी चार टॉप, चार बेसला परवानगी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापराबाबतही पोलीस आयुक्तांनी भूमिका स्पष्ट केली. पुण्यात चार टॉप आणि चार बेस डेसिबलच्या निर्धारित मर्यादेत डीजे वाजवण्यास परवानगी असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. मात्र, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Vidyanand Bapat Pune Police Commissioner
Vidyanand Bapat Attack: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? काय काम करतो? हल्ल्यानंतर काय म्हणाला?

विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी घेतलेली कठोर भूमिका आणि बापट यांना देण्यात आलेली सुरक्षा यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. आगामी काळात या प्रकरणातील आरोपीवर कोणती कारवाई होते आणि न्यायालय पोलीस कोठडीबाबत काय निर्णय देतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news