

वेल्हे: राजगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वेल्हे-वांगणी या गटात निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. हा गट ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. आघाडी-युतीची वाट न बघता सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढाईचे रणशिंग फुंकले आहे. (Latest Pune News)
मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दोन्ही गणांतील काँग््रेासचे उमेदवार निवडून आले होते. हे उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने विजयी झाल्याने या वेळी विरोधकांनी जोर लावला आहे. काँग््रेासचे माजी आमदार संग््रााम थोपटे यांनी कमळ हाती घेतल्याने आता पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे, तर विधानसभेतील बदलानंतर राष्ट्रवादी काँग््रेासने देखील आमदार शंकर मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासाठी तालुका पिंजून काढला आहे.
वेल्हे-वांगणी गटात भाजपकडून विद्यमान सदस्य दिनकरराव धरपाळे यांना संधी दिली जाणार की पंचायत समितीचे माजी सभापती दिनकरराव सरपाले, शिवाजी चोरघे, आकाश वाडघरे या नवीन चेहऱ्याला संग््रााम थोपटेंची पसंती मिळणार, याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. मागील निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणूक लढविलेल्या एकसंध राष्ट्रवादीचे संतोष रेणुसे, मनसेचे गोपाळ इंगुळकर यांनी आमदार शंकर मांडेकरांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद देशमाने, युवकचे अध्यक्ष संदीप खुटवड, केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे व महिलांना देवदर्शन घडवून आणणारे तानाजी मांगडे हेदेखील इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून गोरक्ष भुरुक तयारी करीत आहेत. शिवसेनेकडून संतोष धुमाळ, दत्तात्रय देशमाने, नथुराम रेणुसे, अंकुश चोरघे हे इच्छुक आहेत. शिवसेने (उबाठा) कडून उपजिल्हप्रमुख शैलेश वालगुडे हे रिंगणात उतरणार आहेत. मनसेकडून तानाजी राजीवडे यांनी तयारी केली आहे.
या गटातील वांगणी गणामध्ये सर्वसाधारण, तर वेल्हे गणात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. वांगणी गणात (सर्वसाधारण) भाजपकडून विशाल वालगुडे, राहुल मराठे, राहुल रणखांबे, प्रकाश बधे, रवींद्र दसवडकर इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये सुरवडचे सरपंच अशोक सरपाले, राजू गिरंजे, विजय चोरघे; तर शिवसेना (उबाठा) तालुकप्रमुख उमेश नलावडे यांच्यासह शिवसेनेतून मनीषा चोरघे, अंकुश दामगुडे, पुरुषोत्तम उफाळे आणि मनसेकडून संदीप सरपाले, अशोक चोरघे, दत्ता शेंडकर, दत्ता चोरघे, राजू झांजे आदी इच्छुक आहेत.
वेल्हे गणात (सर्वसाधारण महिला) भाजपकडून निकिता पवार, गौरी भरम, संध्या बेलदरे तयारी करीत आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासच्या माजी सभापती संगीता जेधे, रोहिणी देशमाने, सीता खुळे, छाया गोरड ह्या पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेने (उबाठा)तून शीतल तुपे, तर शिवसेनेच्या संध्या देशमाने, कल्याणी धुमाळ, शीतल कोकाटे ह्या तयारी करीत आहेत. मनसेकडून रूपाली शिंदे इच्छुक आहेत. यांच्यासह राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष, काँग््रेास व इतर पक्षांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
नेमकी संधी कोणाला, हे काळच ठरवेल
पक्षात कार्यरत असलेल्या मूळ ओबीसींना पक्ष तिकीट देणार की कुणबीचे दाखले काढलेल्या मराठा समाजातील व्यक्तीला पक्ष तिकीट देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळी फराळ वाटप, देवदर्शन यात्रा, मतदारांच्या गावभेटी, यातून इच्छुकांनी आपला गट-गण पिंजून काढायला सुरुवात केली आहे. राजगड तालुका पुन्हा संग््रााम थोपटे यांच्या विचारांच्या नेतृत्वाला संधी देणार की विधानसभेप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत परिवर्तन घडविणार, हे येणारा काळच ठरवेल.