

शंकर कवडे
पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक वाढली आहे. रविवारी बाजारात ९० ते १०० ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. आवकेच्या तुलनेत मागणी कमी पडल्याने टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर आणि वांगी यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. स्थानिक भागातील मटारचा हंगाम संपला तर, बाजारात जुन्यासह नव्या कांद्याची आवक होत असल्याचे सांगण्यात आले.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये बंगळुरू येथून आले २ टेम्पो, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची २० ते २२ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा ४ ते ५ टेम्पो, इंदूर येथून गाजर ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार ६०० गोणी, तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा २ ते ३ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ७० ते ८० क्रेट, मध्य प्रदेश येथून लसूण १० ते १२ टेम्पो, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा ५० टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ४५० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ६ ते ७ टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ३ ते ४ टेम्पो, पावटा २ टेम्पो, नवा आणि जुना कांदा सुमारे १०० ते १२५ टेम्पो आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव (रुपयांत)
कांदा : ३७०-४३०, बटाटा : १००-२००, लसूण : ८००-२५००, आले (सातारी) : ८००-१७००, भेंडी : २००-३५०, गवार : ४००-६००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : ३००-४५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : २००-३००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १८०-२००, पापडी : ४००-४५०, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : ५०-१००, कोबी : ५०-६०, वांगी : १५०-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ५०-६०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १८०-२००, शेवगा : ६००-८००, गाजर : २२०-३२०, वालवर : ३५०-४००, बीट : २४०-२५०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ७००-८००, मटार : १०००-१३००, पावटा : ८००-१०००, तांबडा भोपळा : ८०-१५०, तोतापुरी कैरी : ७००-८००, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्या तेजीत
रविवारी बाजारात कोथिंबिरीच्या एक लाख, तर मेथीच्या ७० हजार जुड्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक २५ हजार जुड्यांनी घटली, तर मेथीची आवक २० हजार जुड्यांनी वाढली पाण्याच्या तुटवड्यासह उन्हाच्या चटक्याचा परिणाम भाज्यांच्या प्रतवारीवर होत आहे. त्यामुळे दर्जेदार पालेभाज्यांना अधिक दर मिळत असल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारात पालेभाजीच्या एका गड्डीची ५ ते १५ रुपयांना, तर किरकोळ बाजारात १५ ते ३० रुपयांना विक्री सुरू आहे.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव (रुपयांत) : कोथिंबीर : १५००-२०००, मेथी : १०००-१५००, शेपू : १२००-१५००, कांदापात : १०००-१२००, चाकवत : १२००-१५००, करडई : ८००-१०००, पुदिना : ५००-६००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ६००-८००, चुका : ६००-८००, चवळई : ६००-८००, पालक : ८००-१२००.