Pune Fruit Prices: दिवाळीच्या खरेदीचा फळबाजाराला फटका; लिंबाच्या गोणीमागे ६०० रुपयांची घसरण!

मार्केट यार्डात मागणी घटल्याने कलिंगड, खरबूज, पपईही स्वस्त; सोलापूरच्या चमेली बोरांची आवक सुरू
Lemon
LemonPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळीच्या खरेदीची लगबग वाढली असताना ग्राहकांनी फराळाचे साहित्य, कपडे आणि अन्य वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिल्याने फळांच्या बाजाराला मात्र मंदीचा फटका बसला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात आवक कायम असताना मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याने लिंबाच्या १५ ते २० किलोच्या गोणीमागे तब्बल ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाली आहे.

Lemon
Pune Fish Price Hike: वादळाचा मासळी बाजाराला फटका; मासळीचे दर १० टक्क्यांनी वाढले!

त्यापाठोपाठ कलिंगड, खरबूज आणि पपईचे दरही किलोमागे चार ते पाच रुपयांनी उतरले आहेत. उर्वरित फळांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. दरम्यान, सोलापूरच्या चमेली बोरांचा हंगाम सुरू झाल्याने उमराण आणि चेकनटपाठोपाठ चमेली बोरांचीही बाजारात आवक सुरू झाली आहे.

Lemon
NEET SS 2026 Registration: डॉक्टरांसाठी सुपर स्पेशालिटीची संधी! नीट एसएस २०२६ नोंदणी सुरू; १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

फळबाजारात रविवारी (दि. १) लिंबू बाराशे गोणी ते चौदाशे गोणी, मोसंबी ७० ते ८० टन, संत्रा ४० ते ५० टन, डाळींब ५० ते ६० टन, पपई १० ते १५ टेम्पो, कलिंगड ८ ते १० गाड्या, खरबूज १८ ते २० टेम्पो, चिक्कू २ हजार डाग, पेरु साडेतीन ते चार हजार क्रेट, पिअर ५ गाड्या, सिताफळ ८ ते १० टन, ड्रॅगन १२ ते १५ टन, सफरचंद ६ ते ७ हजार पेटी आणि अननसाची ६ ट्रक इतकी आवक झाली होती.

Lemon
Pavitra Portal Teacher Recruitment: शिक्षक भरतीत संस्थाचालकांची मनमानी रोखणार; मुलाखतीचे केवळ १० गुण!

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते १६००, मोसंबी : (३ डझन) : १२०-३२० (४ डझन) : ४०-१३०, संत्रा : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-२५०, आरक्ता : १०-६०, गणेश : १०-४०, कलिंगड : ८-१५, खरबूज : १२-३०, पपई : १२-२५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००,

Lemon
Cyclone Murasu: बंगालच्या उपसागरात आठवड्यात दुसरे चक्रीवादळ? ‘मुरासू’मुळे आंध्र प्रदेशात अतिवृष्टीचा अंदाज

पेरु (२० किलो) : ३००-५००, अननस (१ डझन) : ३००-९००, सिताफळ (१ किलो) : २०-१००, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००. ड्रॅगन (एक किलो ) ७०-१००, सफरचंद कश्मिर डेलिशियस (१५ ते १७ किलो) १४००-२२००, किन्नोर (२० ते २५ किलो) ४०००-४५००, शिमला (२० ते २५ किलो ) ३०००-३५००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.