Pune Fish Price Hike: वादळाचा मासळी बाजाराला फटका; मासळीचे दर १० टक्क्यांनी वाढले!

आवक घटल्याने पुरवठा अपुरा; अंडीही महागली, मटण-चिकनचे दर मात्र स्थिर
Fish
Fish Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीलगतच्या समुद्रात निर्माण झालेल्या अर्णब वादळाचा फटका मासळीला बसला आहे. परिणामी, येथून होणारी मासळीची आवक घटल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Fish
NEET SS 2026 Registration: डॉक्टरांसाठी सुपर स्पेशालिटीची संधी! नीट एसएस २०२६ नोंदणी सुरू; १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

दुसरीकडे, मटण आणि चिकनला चांगली मागणी असली, तरी त्या तुलनेत पुरेसा पुरवठा होत असल्याने दोन्हींचे दर स्थिर आहेत. मात्र, अंड्यांच्या दरांत वाढ झाली असून, घाऊक बाजारात इंग्लिश अंडी शेकड्यामागे ६० रुपयांनी, तर गावरान अंडी ४० रुपयांनी महागली आहेत.

Fish
Pavitra Portal Teacher Recruitment: शिक्षक भरतीत संस्थाचालकांची मनमानी रोखणार; मुलाखतीचे केवळ १० गुण!

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. १) खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, खाडीच्या मासळीची २५० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची २५० ते ३०० किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून १५ ते २० टन आवक झाली.

Fish
Cyclone Murasu: बंगालच्या उपसागरात आठवड्यात दुसरे चक्रीवादळ? ‘मुरासू’मुळे आंध्र प्रदेशात अतिवृष्टीचा अंदाज

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १६००-२२००, मोठे : १५००-१८००, मध्यम : ११००-१४००, लहान : ९००-१०००, भिला : ६००-८००, हलवा : ६००-८००, सुरमई ७००-१२००, रावस : ७००-९००, घोळ : ८००-९००, करली : ३००-३५०, भिंग : ४००-४५०, पाला : लहान : ६००-९०० मोठा : १२००-१५००, वाम : पिवळी ६००-८००, काळी : ३००-४००, ओले बोंबील : २००-३००. कोळंबी : लहान : १८०-२८०, मध्यम : ३६०-५२०, मोठी : ५५०-७५०, जम्बो प्रॉन्स : १०००-१४००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १८००-२२००, मोरी : ३००-३५०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २५०-३००, खेकडे : ३००-४००, चिंबोर्‍या : ६५०-७५०.

Fish
Marathi Movies Diwali Release: दिवाळीत सहा मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित; हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत कस लागणार!

खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३००, खापी : २००-२५०, नगली : ३५०-४००, तांबोशी : ५००-६००, पालू : २००-२५०, लेपा : ३००-३५०, बांगडा : २००-३००, शेवटे : २००-२५०, बेळुंजी : १२०-१६०, तिसर्‍या : २५०-३००, खुबे : १५०-१८० तारली : २००-२५० नदीतील मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ३५०-४००, शिवडा : १८०-२२०, खवली : १८०-२४०, आम्ळी : १००-१६०, खेकडे : २५०-३५०, वाम : ३५०-४५०. मटण : बोकडाचे ८८०, बोलाईचे ८८०, खिमा ८८०, कलेजी ९२०. चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १२७० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ६७०, डझन ९०, प्रतिनग ७.५०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.