Pune Diwali Grocery Market: दिवाळी तोंडावर, तरी भुसार बाजारात खरेदीचा उत्साह मंदावला!

साखर-गुळाची मागणी वाढली; पुरवठा पुरेसा असल्याने दर स्थिर, महागाईमुळे ग्राहकांची गरजेपुरतीच खरेदी.
Jaggery
JaggeryPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात खरेदीला अद्याप अपेक्षित उठाव मिळालेला नाही. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखर आणि गुळाच्या मागणीत वाढ झाली असली, तरी पुरेसा पुरवठा असल्याने त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Jaggery
Pune Fruit Prices: दिवाळीच्या खरेदीचा फळबाजाराला फटका; लिंबाच्या गोणीमागे ६०० रुपयांची घसरण!

दुसरीकडे, अन्नधान्यांचे दर आधीच वाढलेले असल्याने ग्राहकांकडून गरजेपुरतीच खरेदी केली जात आहे. त्यामुळे बाजारात अद्याप ग्राहकांची अपेक्षित वर्दळ दिसून येत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Jaggery
Pune Fish Price Hike: वादळाचा मासळी बाजाराला फटका; मासळीचे दर १० टक्क्यांनी वाढले!

दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या साखर, गूळ, खाद्यतेल, बेसन, पोहे आणि डाळींना अद्याप अपेक्षित मागणी नाही. साखर आणि गुळाच्या खरेदीत काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी आवक पुरेशी असल्याने दर स्थिर आहेत.

Jaggery
NEET SS 2026 Registration: डॉक्टरांसाठी सुपर स्पेशालिटीची संधी! नीट एसएस २०२६ नोंदणी सुरू; १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदळाचे यापूर्वी वाढलेले दर कायम आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याऐवजी आवश्यकतेनुसारच मालाची उचल केली जात आहे. दरम्यान, गोटा खोबरे आणि शेंगदाण्याच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. सध्या उपवासाचे दिवस नसल्याने साबूदाणा, भगर आणि नारळाची मागणी कमी आहे.

Jaggery
Pavitra Portal Teacher Recruitment: शिक्षक भरतीत संस्थाचालकांची मनमानी रोखणार; मुलाखतीचे केवळ १० गुण!

मागणी आणि पुरवठ्यात समतोल असल्याने खाद्यतेल, डाळी, आटा, मैदा, पोहे आणि लाल मिरचीचे दरही मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. दुष्काळी परिस्थितीचाही खरेदीवर परिणाम होत असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दिवाळी जवळ येत असल्याने येत्या आठवड्यात फराळाच्या साहित्याच्या खरेदीला वेग येऊन भुसार बाजारातील ग्राहकांची वर्दळ वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.