वसंतराव म्हणजे अजब रसायन : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

पुण्याच्या संवाद सेवा संस्थेतर्फे वसंतराव मसके यांच्या एक्काहत्तरीनिमित कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अतिरिक्त सचिव डॉ. नितीन करीर, डॉ. पी. डी. पाटील, विश्वास पाटील, अशोक विखे पाटील, गायिका वैशाली सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुण्याच्या संवाद सेवा संस्थेतर्फे वसंतराव मसके यांच्या एक्काहत्तरीनिमित कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अतिरिक्त सचिव डॉ. नितीन करीर, डॉ. पी. डी. पाटील, विश्वास पाटील, अशोक विखे पाटील, गायिका वैशाली सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा
'सरकारी नोकरी करणे म्हणजे रोज खिशात वरिष्ठांच्या अन् सरकारच्या शिव्या घेऊन याव्या लागतात, याचा अनुभव पोलिस उपनिरीक्षक असताना घेतलेला आहे. मात्र, अत्यंत मृदूभाषी व सर्वांना हवाहवासा वाटणार्‍या वसंतरावांनी हे सर्व झेलून इतकी वर्षे सरकारी सेवा पूर्ण केली हे शिकण्यासारखं आहे, वसंतराव म्हणजे अजब रसायन आहे,' असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. 'निवृत्ती झाली म्हणजे पिडा गेली हे म्हणणे चुकीचेच असते, हे आजच्या कार्यक्रमावरून म्हणावे लागेल,' असेही शिंदे म्हणाले.
पुण्याच्या संवाद सेवा संस्थेतर्फे वसंतराव मसके यांचा कृतज्ञता सोहळा एस. एम. जोशी सभागृहात पार पडला, त्यावेळी शिंदे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर वसंतराव मसके, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, अतिरिक्त सचिव डॉ. नितीन करीर, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील, अशोक विखे पाटील, गायिका वैशाली सामंत आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, 'आजच्या काळात सुरेख समारंभ भरवून हसत खेळत आनंद घेणे, यासारखे सुख कशातच नाही. मी वयस्कर माणूस काय बोलणार, वैशाली सामंत यांनी गीतरुपात जे भाव व्यक्त केले, त्याचवेळी कार्यक्रम संपला होता असे मला वाटले होते. सरकारी सेवेतील उत्तम प्रशासन म्हणजे करीर अन् मसके असे समीकरण म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

मदत करणार्‍या अधिकार्‍याचा अन् आमचा जवळचा संबंध असतो, यामुळे आम्हीही अशा अधिकार्‍यांना जवळ करून लोकांची कामे पटापट करून घेतो.' सचिन इटकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, वसंतराव याचे नाव राजकीय, प्रशासकीय, साहित्य विभागात घेतले जाते. आता यापुढे प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून वसंतराव यांचे नाव घेतले जाईल. सोलापूरच्या सुपुत्राने पुण्यात येऊन नावलौकिक केला आहे, ही अभिमानाची बाब आहे. यानंतर पुण्याच्या संवाद सेवा संस्थेतर्फे मानपत्राचे वाचन करून पत्नी कौशलताई यांच्यासह कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते 'वसंत वैभव' स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी आपल्या विनोदी शैलीत मसके यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, वसंतराव म्हणजे उत्साहमूर्ती, दुसर्‍यांच्या मदतीसाठी धावून जाणे हे त्यांच्यातील मोठे गुण आहेत. कोणाविषयी वाईट विचार करण्यापेक्षा त्यांची मदत करण्याची सवयच म्हणजेच त्यांनी कमविलेली संपत्ती असे म्हणता येईल. आत्मविश्वासू अन् सर्वांना एका धाग्यात बांधून मैत्री जपणारा व्यक्ती म्हणजे मसके होय, असे गौरवोद्गार डॉ. पाटील यांनी वसंतराव मसके यांच्याबद्दल काढले. डॉ. अशोक विखे पाटील, डॉ. नितीन करीर, वैशाली सामंत, विश्वास पाटील, दत्तात्रय भरणे यांनी मनोगत व्यक्त केले.

'डॉ.पी. डी. पाटील यांचे दर्शन घेणे प्रसाद मिळाल्यासारखं'

सत्काराला उत्तर देताना मसके म्हणाले, 'डॉ. पी. डी. पाटील यांचे दर्शन घेणे हे प्रसाद मिळाल्यासारखं आहे. उत्तम प्रशासन राबवून मोठी शिक्षण संस्था कशी उभी करून उत्तमरीत्या चालवली जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या संस्थेचा उल्लेख करावा लागेलच. तर करीर यांच्याबद्दल बोलताना मसके म्हणाले, ते लवकरच सीएस होणार असून त्यांच्यासारखा अधिकारी सरकारी सेवेत असणे म्हणजे तंत्रज्ञानाचा सदुपयोग करण्यासारखे आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news