

पुणे: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आघाडीला वंचितच्या 40 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु, ही युती होऊ शकली नाही. मात्र, काँग््रेासकडून चुकीचा प्रचार करण्यात आला. त्यामुळे वंचितने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत 41 प्रभागांत 58 उमेदवार उभे केले असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष अजित तायडे आणि सचिव बी. पी. सावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत तायडे म्हणाले, काँग््रेास आणि उबाठा यांच्या आघाडीबरोबर दोन बैठका झाल्या. त्यामध्ये 40 जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्यावर काँग््रेासकडून कोणतेही उत्तर आले नाही. मात्र, वंचितबरोबर युती झाल्याचा खोटा प्रचार काँग््रेासचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून करण्यात आला. असाच प्रस्ताव सुप्रिया सुळे यांनाही देण्यात आला होता. भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध आले तेथे वंचितकडे उमेदवार होता. परंतु काँग््रेास आणि उबाठा यांनी याठिकाणी उमेदवार न देता भाजपला मदतच केली असल्याचा आरोप ही तायडे यांनी यावेळी केला.
कॉंग््रेासची या निवडणुकीत दुटप्पी भूमिका दिसून आली आहे. ज्या मनसेने भोंगा विरोधात राज्यभर रान उठवत मुस्लिमांना त्रास दिला. ते मात्र काँग््रेासला समविचारी पक्ष वाटत आहे आणि वंचित मात्र समविचारी पक्ष वाटत नाही. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ युती करण्यास तयार होते. परंतु शहर पातळीवर एकत्र झाले नसल्याचा आरोपही तायडे यांनी यावेळी केला.
वंचित बहुजन आघाडीची यादी
प्रभाग 1 : योगिता विशाल भोसले (अ), कुणाल श्रीरंग भोसले (ब), शेख बियम्मा रुस्तम (क), स्वीटी अमोल कांबळे (ड)
प्रभाग 2 : स्नेहल कैलास घोरपडे (अ), अभिजित शिवाजी खत्री (ब), अमजद मगदूम (क).
प्रभाग 3 : प्रतिभा कांबळे (क), सुहास जनार्दन ठोकळ (ड).
प्रभाग 4 : श्रीनिवास रामलू दासारी (ड).
प्रभाग 5 : पंकज हरी साबळे (ड).
प्रभाग 6 : शैलेश (पाला) मोरे (अ), सलमा सादिक शेख (क).
प्रभाग 7 : योगिता मुकुंद कांबळे (अ), युसुफ शेख (क).
प्रभाग 8 : मिलिंद गेनू खरात (अ), अश्विनी अशोक गायकवाड (क).
प्रभाग 9 : रोशनी नगर धनकर (पोळ) (अ).
प्रभाग 11 : शुभांगी बाळासाहेब खंकाळ (ब), दीपक पांडुरंग कांबळे (ड).
प्रभाग 12 : समिधा किरण कांबळे (अ), मंजू विश्वनाथ वाघमारे (क), संदीप अशोक चव्हाण (ड).
प्रभाग 13 : डॉ. निकिता मयूर गायकवाड (अ), स्वाती सुरेश धनगर (क), ॲड. गजानन श्रीराम चौधरी (ड).
प्रभाग 14 : लाभिनी अजित वाघमारे (अ), शुभांगी जितेंद्र काकडे (क), मोसीन आयजू शेख (ड).
प्रभाग 15 : रोहिणी प्रवीण पाटोळे (अ).
प्रभाग 16 : हरी ज्ञानोबा वाघमारे (ड).
प्रभाग 17 : विशाल कसबे (अ), कोमल सचिन शेलार (क), अकबर राजे सय्यद (ड).
प्रभाग 19 : हमीदा अमीर पटेल (ब), नाडेवाले फिरोज नियाज (क).
प्रभाग 21 : ॲड. कपिल लाडप्पा शिवशरण (अ), मोहम्मद मुजम्मील अब्दुल अजीज शाद्दी (ड).
प्रभाग 22 : आरती रॉकीसिंग कल्याणी (अ), विकी विजय भालेराव (ड).
प्रभाग 23 : हर्षवर्धन आबूराव साळवे (अ).
प्रभाग 24 : पंचशील मोहन वाघचौरे (क), कुमार विठ्ठल आहेर (ड)
प्रभाग 28 : रागिणी विश्वास कांबळे (अ), स्वाती अनिकेत भालेराव (ड).
प्रभाग 30 : श्रीकांत रघुनाथ चौगुले (अ), चैतन्य प्रभाकर इंगळे (ड).
प्रभाग 33 : वर्षाराणी विलास जाधव (ब), राजेंद्र श्रीमंत कांबळे (क).
प्रभाग 34 : गणेश तुकाराम दनाने (ड).
प्रभाग 36 : सागर नामदेव आल्हाट (अ), दौलतजहा दिलावर शेख (क).
प्रभाग 38 : दीपाली दिलीप सूर्यवंशी (जेठे) (अ), आसमाजबीन असलम चौधरी (ड), नरेंद्र शंकर पारखे (ई).
प्रभाग 39 : उज्ज्वला रवींद्र गायकवाड (अ).
प्रभाग 40 : अक्षय बबन कांबळे (अ), मनोज आबा भिंगारदिवे (ड).