

Pune Sinhagad Road Unidentified Body: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कालव्याजवळ अत्यंत विघटित अवस्थेत आढळलेला हा मृतदेह पाहून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक तपासात मृतदेह अनेक दिवसांपासून त्याच ठिकाणी पडलेला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शरीराची अवस्था पूर्णपणे खराब झाल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख त्वरित पटवणे कठीण झाले होते. मात्र, तपासाच्या पुढील टप्प्यात पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून त्याचे नाव सय्यद (वय 20 वर्षे) असल्याची माहिती दिली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सय्यदचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात आहे, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे निर्माण झाली असून नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
सलग मृतदेह सापडण्याच्या घटनांनंतर सिंहगड रोड परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.