पुणे : 300 चौरस फूट घर देण्याचा मार्ग मोकळा

पुणे : 300 चौरस फूट घर देण्याचा मार्ग मोकळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (एसआरए) राबविण्यात येणार्‍या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील झोपडपट्टीधारकांना 300 चौरस फुटांची सदनिका मिळणार आहे. शासनाने यासंबंधीचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधीची कार्यवाही करण्याचे आदेश एसआरए प्राधिकरणाला दिले आहेत.

विवध संस्थांच्या मागणीला यश

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सहाशेहून अधिक झोपडपट्ट्या असून पुणे शहरातील 40 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होऊन झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासनाने एसआरए हे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले आहे. एसआरएतील तरतुदीनुसार पात्र झोपडपट्टीधारकांना 270 फुटांचे घर दिले जात होते. मात्र, मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही झोपडपट्टीधारकांना 300 चौरस फुटांचे घर मिळावे, अशी मागणी झोपडपट्टीवासीय आणि विविध संस्थांकडून करण्यात येत होती. त्यावर अखेर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केला आहे. यासंबंधीचे आदेश नगरविकास खात्याने मंगळवारी काढले आहेत.

या आदेशानुसार एसआरए योजनेत झोपडपट्टीधारकांना 25.00 चौमी ऐवजी आता 27.88 चौमी म्हणजेच 300 चौरस फुटांची सदनिका देण्याबाबत एसआरए प्राधिकरणाने फेरबदलाची कार्यवाही करून त्यासंबंधीचा अहवाल राज्य शासनाला मंजुरीसाठी सादर करावा, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार आता या निर्णयावर हरकती-सूचना मागवून त्यास अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर झोपडपट्टी वासीयांना तीनशे चौरस फुटांचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्र्यांचे आभार

झोपडपट्टीवासीयांना तीनशे चौरस फुटांचे घर देण्याच्या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसने आभार मानले आहेत. तीन दिवसांपूर्वीच याबाबत उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news