Ujani Migratory Birds‌: ‘उजनी‌’वर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले!

थंडीचा अभाव आणि अतिवृष्टीमुळे विदेशी पाहुण्यांचा प्रवास रखडला; पक्षीप्रेमी फ्लेमिंगोच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत
‘उजनी‌’वर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले!
‘उजनी‌’वर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले!pudhari
Published on
Updated on

प्रवीण नगरे

पळसदेव : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या किनाऱ्यावर दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात शेकडोंच्या संख्येने नानाविध स्थलांतरित पक्षी येऊन दाखल होत असतात. परंतू, यंदाची अतिवृष्टी व थंडीच्या अभावामुळे त्यांचा प्रवास तुर्तास रखडला आहे. शिवाय धरण काठोकाठ भरल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील त्यांचा चराऊ भाग पाण्याखाली गेल्याने खाद्य उपलब्ध होत नसल्याने विदेशी पाहुणे ‌’उजनी‌’वर येऊ शकले नाहीत. तरी पुढील काही दिवसांत परदेशी पाहुण्यांच्या आगमनाने उजनी परिसर गर्दीने गजबजण्याची शक्यता असल्याचा अंदाज पक्षी अभ्यासक व्यक्त करत आहेत.(Latest Pune News)

‘उजनी‌’वर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले!
Pune Counselling Center: समुपदेशनाच्या मदतीने पुन्हा जुळले 108 संसार

पावसाळ्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागताच उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून अनेक उत्तुंग पर्वतश्रेणी व अथांग महासागरावरून प्रवास करून हजारो किलोमीटर अंतर पार करून दरवर्षी उजनी पाणलोट क्षेत्रात शेकडो प्रकारच्या लक्षावधी संख्येने विदेशी पक्षी न चुकता वाऱ्या करतात. दरवर्षी पावसाळ्यांती हे पक्षी उजनीवर येण्यास सुरुवात करतात.

पावसाळ्याच्या शेवटी उजनी धरण पूर्णक्षमतेने भरते व तेथील जलचर प्राण्यांचे जीवनचक्र जोमाने सुरू होते. या जलचरांवर गुजराण करण्यासाठी नानाविध पक्षी भारतवर्षाच्या सीमा ओलांडून स्थलांतर करून उजनी परिसरात येऊन दाखल होतात. अनंत अडचणींवर मात करून हे पक्षी पुढील तीन ते चार किंबहुना पाच महिन्यांसाठी उजनीवर आपला डेरा टाकतात. तीन-चार महिन्यांच्या त्यांच्या वास्तव्यात बहुतांशी पक्षी उदरनिर्वाह करून घेतात तर काही पक्षी प्रजननोत्पत्ती करून घेतात.

‘उजनी‌’वर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले!
Junnar Leopard Population: आशियातील सर्वाधिक बिबटे जुन्नर वनक्षेत्रात; वन विभागाचा धक्कादायक अहवाल

पक्षीप्रेमी फ्लेमिंगोच्या प्रतीक्षेत

‌‘उजनी‌’वरील पक्षी वैभवात प्रथम प्राधान्य असलेले नजाकतदार रोहित अर्थात फ्लेमिंगो अद्याप आले नाहीत. गुलाबी छटा असलेले हे पक्षी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येत असतात. परंतु, यावर्षी अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे उजनी काट अतिशय शांत आहे. पुढील काही दिवसातच हे पक्षी येऊन दाखल होतील, असा अंदाज आहे.

जलाशयातील पाणी पोषक

यावर्षी उजनी धरण अपेक्षापेक्षा लवकर भरले व संपूर्ण पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला; परिणामी साठवून राहिलेले मृत पाणी उजनी धरणातून बाहेर पडून त्याठिकाणी नवीन पाणी साठल्याने पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असलेल्या मासे व इतर जलचरांसह

शेवाळांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या कारणाने वाढणाऱ्या मासे व जलकीटक तसेच शैवालांचा अंदाज घेत विदेशातून पाहुणे पक्षी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे, असे मत उजनीवर नित्यनेमाने भटकंती करणारे पक्षी निरीक्षक व्यक्त करत आहेत.

‘उजनी‌’वर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले!
Maharashtra Olympic Association Election: महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत समझोता?

गेल्या मे महिन्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसाच्या परिणाम प्रवाशी पक्ष्यांच्या आगमनावरती नक्की जाणवत आहे. हवामानातील अस्थिरता व अनियमितता हा स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या प्रवासावर विपरीत परिणाम होतो. यावर्षी परतीचा पाऊस उशिरा परतल्यामुळे शिवाय नुकताच बंगालच्या उपसागरात उद्भवलेल्या कमी दाबाच्या पट्‌‍ट्यामुळे पाऊस अद्याप सक्रिय आहे. त्यामुळे याचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर झाला आहे. याच कारणामुळे ऑक्टोबर महिन्यात येऊन दाखल होणारे अनेक स्थलांतरित पक्षी अद्याप आले नाहीत. वातावरण स्थिरावल्यानंतर धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढेल.

डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक

‘उजनी‌’वर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले!
Maharashtra Olympic Association Election: महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत समझोता?

नवीन स्थलांतरित पक्षी येतील का?

धरणनिर्मितीनंतर दरवर्षी सुमारे 80 प्रकारचे विदेशी पक्षी हिवाळ्यात उजनी जलाशयावर येऊन दाखल होतात. प्रथमच आलेला बीन हंस, ग््रेा लॅग गूज, फेलोरोप, छोटा रोहित (लेसर फ्लेमिंगो) हे पक्षी दरवर्षी न येता कधी तरी आपली हजेरी लावतात. उत्तर धुवाकडील नार्वे, स्वीडन, फिनलॅंड या शीतवलयातील देशांमधून यावर्षी हे खास परदेशी पाहुणे येतील का पक्षी अभ्यासकांमधील उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news