

भिगवण: बघता बघता उजनी धरणाची पाणीपातळी वेगाने खलावू लागली असून, उजनीचा उपयुक्त पाणीसाठा 25.18 टक्क्यांवर आला आहे. साहजिकच लवकरच उजनी मायनसमध्ये जाणार आहे. यंदा पाऊसमान कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने व उजनीचा झपाट्याने खालावणारा पाणीसाठा बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरू पाहात आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात उजनी पाणलोट क्षेत्रात पाण्याची तीव टंचाईचा सामना धरणग््रास्त शेतकरी व गावांना बसत असतो. अगदी फेबुवारीपर्यंत उजनीत 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असतो, परंतु फेबुवारीच्या मध्यापासून ते मेअखेर उपायुक्त साठा संपून उजनी मायनसमध्ये जाते. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील धरणग््रास्तांची पाण्यासाठी वणवण पाहावयास मिळते. उजनीच्या पाण्यावरून पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकारण देखील तापते. वास्तविक नियोजनाचा अभाव असल्याने धरणग््रास्तांच्या वाट्याला पाणीटंचाई पुजलेली आहे.
गेल्या प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने व धरण भरल्याने यावर्षी पाणीटंचाई जाणवणार नाही अशी आशा होती; मात्र, सद्यस्थिती पाहता या आशेवर पाणी फेरण्याची शक्यता आहे. मुळात तर या वर्षीच्या पावसाचा अंदाज व भाकीत पाहता पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. यापूर्वी दुष्काळ पडल्यानंतर काय स्थिती उद्भवते हे धरणग््रास्तांनी पाहिले आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी संघर्षाची वेळ या भागावर आलेली आहे.
सध्या उजनीत केवळ 25.18 टक्के उपयुक्त पाणीसाठा असला तरी सध्या सीना माढा बोगद्यातून 270 क्युसेक, दहिगाव 80, कालवा 830 व मुख्य कालव्यातून 2 हजार 860 क्युसेकने पाणी खाली सोडले जात आहे. बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात आहे. एक तर यावर्षी सूर्य आग ओकत असल्याने बळीराजाची पिके दोन दिवसाला पाण्याला येत आहेत. धरणाकाठच्या गावांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पाण्याचे काटकसरीचे नियोजन हवे.
प्रशासनाने बोध घेण्याची गरज
यावर्षीच्या कमी पावसाचा अंदाज व भाकीत लक्ष्यात घेऊन आणि पाणीटंचाईचा पूर्वानुभव लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास पाच टीएमसी पाणी उजनीत आणता आणता कसा घाम आणि फुगा येतो याचा पूर्वानुभव प्रशासनाने घेतला असल्याने याचा बोध घेण्याची गरज आहे.