Ujani Dam Migratory Birds: उजनी जलाशयात परदेशी पक्ष्यांचा मुक्काम; फ्लेमिंगोसह रंगीबेरंगी पक्ष्यांनी फुलले मिनी भरतपूर

पाणीपातळीत घट झाल्याने पाणथळ जागांची निर्मिती; आफ्रिका, इंग्लंडमधून येणाऱ्या गुलाबी मैना पक्ष्यांचेही पर्यटकांना आकर्षण
Flamingo
FlamingoPudhari
Published on: 
Updated on: 

भिगवण: यंदा उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने पाणथळ जागा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे देश-विदेशातील आकाशयात्रींनी उजनीकडे स्थलांतर केले आहे. अगदी फ्लेमिंगो पक्ष्यांसह विविध जातींच्या रंगबिरंगी पक्ष्यांच्या कवायती व किलबिलाटाने उजनी बहरून गेली आहे.

Flamingo
Naandi Sammelan Fund: नांदी संमेलनांच्या २ कोटींच्या निधीचा हिशेब मागविला; महाराष्ट्र साहित्य परिषदेत वाद कायम

पक्ष्यांच्या आगमन बरोबर पर्यटक व अभ्यासकांची पाऊले देखील उजनीच्या दिशेने वळली आहेत. यंदा पाण्यासाठी दुष्काळी परिस्थिती असली तरी पक्ष्यांना मात्र सुकाळ तयार झाला आहे. गेल्या दोन वर्षात सर्वांचे आकर्षण असलेले रोहित पक्षी बोटावर मोजता येतील एवढ्या संख्येने हजर झाले होते.

Flamingo
Pune Dutch Rose Prices: थीम वेडिंगमुळे डच गुलाबांना मोठी मागणी; २० फुलांच्या गड्डीचा दर ५०० रुपयांवर

त्यामुळे मीनी भरतपूर समजले जाणारे उजनी ओस पडणार की, काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, यंदा बऱ्यापैकी पक्ष्यांची लावलेली हजेरी दिलासा देणारी ठरली आहे. एक दिवसाचे पर्यटन म्हणून उजनीकडे पाहिले जाते.

Flamingo
Jejuri ST bus Bike Accident: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर एसटी बस-दुचाकीची भीषण धडक; नाझीरकर दाम्पत्याचा मृत्यू

यामध्ये नौका विहार, प्राणी पक्षी पाहण्याचा आनंद तसेच अस्सल चवदार माश्यांचे चव चाखायला भेटते. विविध जातींच्या पक्ष्यांच्या कवायती पाहताना मन आनंदून जाते. दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात उजनीतून खाली आवर्तन सुरू होते आणि पाणथळ जागा निर्माण होण्यास एप्रिल मे महिना उजाडतो.

Flamingo
Kondhwa Parking Fire: पुण्यातील कोंढव्यात पार्किंगला भीषण आग; १८ वाहने जळून खाक, ३५ रहिवाशांची सुखरूप सुटका

यंदा मात्र मार्च एप्रिलमधील परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या मनाने यंदा पक्ष्यांची मांदियाळी झाली असून, पट्ट कदम, भोवया, चक्रवाक, तलवारी बदक, मासेमार गरुड, चित्रबलाक, राखी बगळा आदी पक्ष्यांची रेलचेल असल्याची माहिती पक्षीमित्र उमेश सल्ले यांनी दिली. त्याचबरोबर आफ्रिका, इंग्लंडहून येणारे गुलाबी मैना देखील खास आकर्षण असल्याचे सल्ले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.