Pune Dutch Rose Prices: थीम वेडिंगमुळे डच गुलाबांना मोठी मागणी; २० फुलांच्या गड्डीचा दर ५०० रुपयांवर

उत्तर भारतात थंडीमुळे उत्पादन घटले; पुण्यातील गुलाबांच्या खरेदीत परराज्यातील व्यापाऱ्यांचा वाटा ६० ते ७० टक्क्यांवर
Rose
RosePudhari
Published on: 
Updated on: 

शंकर कवडे

पुणे: लग्नमंडपात पांढऱ्या गुलाबांची नजाकत, स्वागत कमानींवर गुलाबी-पिवळ्या फुलांची उधळण अन् व्यासपीठावर रंगबिरंगी गुलाबांची आकर्षक आरास... लग्नसराईत ‘थीम वेडिंग’ची क्रेझ वाढल्याने डच गुलाबांना चांगलाच भाव आला आहे. त्यातच उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढल्याने गुलाबांच्या उत्पादनाला फटका बसला असून, तेथील व्यापाऱ्यांनी पुण्याच्या बाजारपेठेकडे मोर्चा वळविला आहे.

Rose
Jejuri ST bus Bike Accident: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर एसटी बस-दुचाकीची भीषण धडक; नाझीरकर दाम्पत्याचा मृत्यू

परिणामी, उत्तर भारतातून होणारी मागणी जवळपास दुप्पट झाली असून, रंगबिरंगी डच गुलाबांच्या २० फुलांच्या गड्डीचे दर पाचशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सध्या राज्यासह परराज्यांत लग्नसराईची धामधूम सुरू आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये सध्या विवाहसोहळ्यांच्या सजावटीसाठी गुलाबांना मोठी मागणी असतानाच थंडीमुळे फुलांची अपेक्षित वाढ होत नाही.

Rose
Kondhwa Parking Fire: पुण्यातील कोंढव्यात पार्किंगला भीषण आग; १८ वाहने जळून खाक, ३५ रहिवाशांची सुखरूप सुटका

परिणामी, उत्पादन घटून स्थानिक बाजारपेठांमध्ये गुलाबाच्या गड्डीचे दर एक हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांकडून पुण्यातील गुलाबांची खरेदी वाढली आहे. एरवी पुण्यातील डच गुलाबांच्या मागणीत उत्तर भारताचा वाटा तीस ते चाळीस टक्के असतो. तो आता साठ ते सत्तर टक्क्यांवर गेला आहे.

Rose
Pune Metro Technical Glitch: पुणे मेट्रोला पहिल्यांदाच मोठा तांत्रिक बिघाड; वनाज-रामवाडी मार्गावरील सेवा दोन तास ठप्प

पांढऱ्या गुलाबांना मागणी

विवाहसोहळ्यांमध्ये पारंपरिक लाल गुलाबांऐवजी सजावटीच्या रंगसंगतीनुसार फुलांची निवड करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे पांढरे, गुलाबी, पिवळे, नारंगी आणि जुमिलिया गुलाबांना विशेष पसंती मिळत आहे. त्यात पांढऱ्या गुलाबांना सर्वाधिक मागणी आहे. मात्र, लाल गुलाबांच्या तुलनेत अन्य रंगांच्या फुलांचे उत्पादन कमी असल्याने त्यांचे भाव अधिक वधारले आहेत. राज्यासह उत्तर भारतातील वाढती खरेदी आणि थीम वेडिंगची क्रेझ यामुळे पुण्यातील डच गुलाबांच्या बाजारपेठेला लग्नसराईत चांगलीच झळाळी आल्याचे निरीक्षण फुलबाजार विभागप्रमुख संतोष कुंभारकर यांनी नोंदविले.

Rose
Sugar Valuation Rate: साखरेचा मालतारण मूल्यांकन दर ४,५०० रुपये प्रतिक्विंटल; साखर कारखान्यांना दिलासा

राज्यासह परराज्यातील लग्नसराईमुळे डच गुलाबांच्या बाजारात सध्या चांगली तेजी आहे. विशेषतः उत्तर भारतातील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने बाजारात दाखल होणाऱ्या दर्जेदार फुलांना उठाव मिळत आहे. मागणी वाढल्याने मालाची आवक होताच खरेदीचे व्यवहार वेगाने पूर्ण होत आहेत. चांगला आकार, आकर्षक रंग आणि टिकाऊपणा असलेल्या गुलाबांना अधिक दर मिळत आहेत. पुढील लग्नतारखांमध्येही खरेदीचा जोर कायम राहिल्यास बाजारातील तेजी टिकून राहण्याची शक्यता आहे.

सागर भोसले, फूलअडतदार, मार्केट यार्ड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.