Naandi Sammelan Fund: नांदी संमेलनांच्या २ कोटींच्या निधीचा हिशेब मागविला; महाराष्ट्र साहित्य परिषदेत वाद कायम

खर्चाचा तपशील, देयके आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याचे मराठी भाषा विभागाचे निर्देश; कार्यकारिणीच्या मान्यतेवरून सदस्यांचे आक्षेप
Maharashtra Sahitya Parishad
Maharashtra Sahitya Parishad Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित नांदी संमेलनांसाठी वितरित केलेल्या २ कोटी रुपयांच्या निधीचा हिशेब मराठी भाषा विभागाने महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे मागविला आहे. खर्चाचा तपशील, देयके, ताळेबंद आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत.

Maharashtra Sahitya Parishad
Pune Dutch Rose Prices: थीम वेडिंगमुळे डच गुलाबांना मोठी मागणी; २० फुलांच्या गड्डीचा दर ५०० रुपयांवर

दरम्यान, ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे मसापचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निधीच्या खर्चाला कार्यकारी मंडळाची मान्यता नसल्याचा आरोप प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या सदस्यांनी केला आहे. तसेच, अहिल्यानगर, कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखांनीही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नांदी संमेलनांवरून सुरू असलेला वाद थांबता थांबेना चित्र आहे.

Maharashtra Sahitya Parishad
Jejuri ST bus Bike Accident: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर एसटी बस-दुचाकीची भीषण धडक; नाझीरकर दाम्पत्याचा मृत्यू

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नांदी संमेलनांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यापैकी दोन कोटी रुपये मसापला वितरित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी १८ नोव्हेंबर रोजी मसापचे अध्यक्ष योगेश सोमण यांना पत्र पाठविले आहे. निधीचा खर्च संस्थेच्या घटनेतील तरतुदी, नियम आणि मंडळाच्या मान्यतेनुसार केल्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. हिशेब प्राप्त झाल्यानंतर पुढील निधी वितरणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Maharashtra Sahitya Parishad
Kondhwa Parking Fire: पुण्यातील कोंढव्यात पार्किंगला भीषण आग; १८ वाहने जळून खाक, ३५ रहिवाशांची सुखरूप सुटका

निधी खर्चाला कार्यकारिणीची मान्यता नसल्याचा आरोप

मसापच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या कार्यकारी मंडळातील सदस्यांनी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांना पत्र पाठविले आहे. नांदी संमेलनांसाठी मिळालेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीच्या विनियोगाबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत कोणताही ठराव मंजूर झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. १६ ऑगस्टच्या बैठकीत आर्थिक आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून बॅनर, स्मृतिचिन्हे, बुकमार्क, प्रवासखर्च आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मानधनाबाबत स्वतंत्र ठराव करण्यात आल्याचेही सदस्यांनी पत्रात म्हटले आहे.

Maharashtra Sahitya Parishad
Pune Metro Technical Glitch: पुणे मेट्रोला पहिल्यांदाच मोठा तांत्रिक बिघाड; वनाज-रामवाडी मार्गावरील सेवा दोन तास ठप्प

ही नियमित प्रक्रिया

राज्य सरकारकडून निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाते. आधीच्या निधीचा खर्च आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पुढील निधी दिला जातो. ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. नांदी संमेलनांसाठी संबंधित संस्थांकडून सनदी लेखापालांमार्फत उपयोगिता प्रमाणपत्रे घेतली आहेत, असे प्रदीप निफाडकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.