Jejuri ST bus Bike Accident: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर एसटी बस-दुचाकीची भीषण धडक; नाझीरकर दाम्पत्याचा मृत्यू

माऊलीनगर परिसरात सोमवारी सकाळी अपघात; महेंद्र आणि रेश्मा नाझीरकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू
Jejuri ST bus Bike Accident
Jejuri ST bus Bike AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

जेजुरी: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर माऊलीनगर परिसरात सोमवारी (दि. २३) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात महेंद्र नाझीरकर आणि रेश्मा नाझीरकर या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दाम्पत्य नाझरे कडेपठार येथील खैरेवस्तीचे रहिवासी आहेत.

Jejuri ST bus Bike Accident
Kondhwa Parking Fire: पुण्यातील कोंढव्यात पार्किंगला भीषण आग; १८ वाहने जळून खाक, ३५ रहिवाशांची सुखरूप सुटका

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील महेंद्र नाझीरकर आणि रेशमा नाझीरकर गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघांनाही तातडीने महाराष्ट्र शासनाच्या १०८ नंबर वरील रुग्णवाहिकेने उपचारासाठी जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Jejuri ST bus Bike Accident
Pune Metro Technical Glitch: पुणे मेट्रोला पहिल्यांदाच मोठा तांत्रिक बिघाड; वनाज-रामवाडी मार्गावरील सेवा दोन तास ठप्प

या अपघाताची माहिती परिसरात समजताच नाझरे कडेपठार आणि खैरेवस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.अपघाताची अधिकृत माहिती, पोलिसांची नोंद आणि पुढील तपासाबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.