UGC Fake Universities List: यूजीसीकडून ३२ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील दोन संस्थांचा समावेश

नागपूरची राजा अरेबिक युनिव्हर्सिटी आणि सोलापूरचे नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ अनधिकृत; विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वी मान्यता तपासण्याचे आवाहन
Fake Universities
Fake UniversitiesPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने देशभरातील बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल बत्तीस बोगस विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Fake Universities
Pune BDP Reservation: पुणे आणि पीएमआरडीए हद्दीतील सर्व डोंगरांवर बीडीपी आरक्षणाची शिफारस; उच्चस्तरीय समितीचा अहवाल

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बोगस विद्यापीठांना पदवी देण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याने त्यांच्याकडून मिळणारे प्रमाणपत्रे वैध मानली जाणार नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी यूजीसीने संबंधित यादी सार्वजनिक केली आहे.

Fake Universities
Baramati Law And Order: अजितदादांनंतर बारामतीत गुन्हेगारीचे आव्हान; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

प्रवेश घेण्यापूर्वी किंवा कोणतेही शुल्क भरण्यापूर्वी शैक्षणिक संस्थांची तसेच विद्यापीठांची मान्यता तपासावी, असे आवाहन यूजीसीने केले आहे. तसेच आकर्षक जाहिराती, वेबसाइट किंवा सोशल मीडियावरील दाव्यांवर अवलंबून राहू नये, असेही स्पष्ट केले आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक बारा संस्था असून उत्तर प्रदेशात चार संस्था आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी या राज्यांमध्ये प्रत्येकी दोन संस्थांची नोंद आहे.

Fake Universities
Baramati Extortion Firing Case: बारामतीत खंडणी न दिल्याने उद्योजकाच्या बंगल्याबाहेर गोळीबार; दोन अल्पवयीन ताब्यात

इतर राज्यांमध्येही काही संस्थांचा समावेश आहे. या संस्थांनी दिलेल्या पदव्या उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी मान्य नाहीत. त्यामुळे प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी यूजीसीच्या वेबसाईटवरील बोगस विद्यापीठांची यादी तपासणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यूजीसीने सर्व संबंधित प्राधिकरणांना आणि शैक्षणिक संस्थांना या सूचनेचा व्यापक प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

Fake Universities
Ujani Dam Migratory Birds: उजनी जलाशयात परदेशी पक्ष्यांचा मुक्काम; फ्लेमिंगोसह रंगीबेरंगी पक्ष्यांनी फुलले मिनी भरतपूर

विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन संस्थेची वैधानिक मान्यता आणि अभ्यासक्रमाची मंजुरी तपासावी. अशा प्रकारे सावधगिरी बाळगल्यास फसवणूक टाळता येईल आणि भविष्यातील अडचणी कमी होतील. पालकांनीही याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील या विद्यापीठांचा समावेश

नागपूर येथील राजा अरेबिक युनिव्हर्सिटी आणि सोलापूर जिल्ह्यातील नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ या संस्था अनधिकृत असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.