बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती- भिगवण रस्त्यावर येथील विद्या काॅर्नर चौकात डंपर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोन युवक ठार झाले. एका युवकाने प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारल्याने तो आश्चर्यकारकरित्या बचावला. प्रतिक विजय भोसले (वय २०) व निखिल सौताडे (वय २०, दोघे रा. दुधोडी, ता. कर्जत, जि. नगर) हे युवक ठार झाले. मंगळवारी (दि. २३) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.