Tukaram Maharaj Palkhi: ‘तुकाराम महाराज’च्या जयघोषाने नाना पेठ दुमदुमले; पालखी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

निवडुंगा विठोबा मंदिरात भक्तीचा सोहळा; पुणेकरांसह हजारो भाविकांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन
Tukaram Maharaj Palkhi
Tukaram Maharaj PalkhiPudhari
Published on
Updated on

पुणे: संत तुकाराम महाराज यांची पालखी गुरुवारी (दि. ९ जुलै) पुण्यातील नाना पेठ येथील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी विसावली. रात्री आरती झाल्यानंतर पुणेकरांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या. असेच चित्र शुक्रवारीसुद्धा (दि. १०) दिसून आले.

Tukaram Maharaj Palkhi
Dnyaneshwar Maharaj Palkhi: ‘ज्ञानोबा-माउली’च्या जयघोषाने पुणे दुमदुमले; ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी पुणे शहरासह आजूबाजूच्या उपनगर आणि जिल्ह्यातील अनेक भाविकांनी शहराच्या मध्यवस्तीत प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी येथील मध्यवस्तीत जाणारे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते.

Tukaram Maharaj Palkhi
Khadakwasla Dam Construction: खडकवासला धरणाच्या काठावर बांधकामाचा धडाका; पुणेकरांच्या पाणी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

असे असतानाही अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह मध्यवस्ती बाहेर आपली वाहने पार्क करून पालख्या असलेल्या नाना पेठ, भवानी पेठ मंदिरांमध्ये दर्शनासाठी आवर्जून येताना दिसले. महापालिका व पोलिस प्रशासनाकडून पालख्यांच्या दर्शनासाठी शिस्तबद्ध नियोजन केल्याचे या वेळी दिसले.

Tukaram Maharaj Palkhi
Dnyaneshwar Maharaj Palkhi Rath: माऊलींच्या नव्या पालखी रथात श्रद्धा अन् आधुनिकतेचा संगम; आळंदी मंदिराच्या शिल्पांची कलाकुसर साकार

मंदिराबाहेर कडक पोलिस बंदोबस्त लावला होता. दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत सोडण्यात येत होते. रांगेच्या नियोजनासाठी मंदिर परिसरात लोखंडी बॅरिकेड लावले होते. निवडुंगा विठोबा मंदिरात सकाळी ९ वाजता पाद्यपूजा झाली, विश्वस्तांच्या हस्ते आरती झाली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दर्शन घेतले. विविध अधिकारी आणि मान्यवरांनीही संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर विश्वस्त विशाल धनवडे यांनी दिली.

Tukaram Maharaj Palkhi
Pune Ashadhi Wari Kirtan Mala: लालमहालात भक्तीचा जागर; १२ तासांच्या अखंड कीर्तनमालेत वारकरी झाले संतपरंपरेत तल्लीन

आज सकाळी ७ वाजता पालखीचे होणार प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा शुक्रवारी निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम झाल्यावर ही पालखी शनिवारी (दि. ११) सकाळी ७ वाजता पुढील मुक्कामासाठी निघणार आहे. हडपसरमार्गे जात ही पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामी राहणार आहे, असेही मंदिराचे विश्वस्त विशाल धनवडे यांनी या वेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news