वरच्या वर्गातील मुलांचा पहिलीतील विद्यार्थ्याला त्रास; पुण्यातील धकाकदायक प्रकार

file photo
file photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पहिलीतील विद्यार्थ्याला त्रास दिल्याप्रकरणी शहरातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंग कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा सहा वर्षांचा मुलगा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिलीत आहे. दोन ते तीन दिवसांपासून शाळेतील वरच्या वर्गातील एक विद्यार्थी आणि त्याचे मित्र या पहिलीतील मुलाला त्रास देत होते. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास मारहाण करू, अशी धमकी विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यामुळे मुलगा घाबरला होता, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबतची माहिती फिर्यादींनी मुख्याध्यापिका यांना दिली होती. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मुलाची आई आणि अन्य पालकांनी सोमवारी (दि. 9) शालेय प्रशासनाला जाब विचारला. मुलाच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, असे दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. याप्रकरणी, शिवसेना (उबाठा) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. या वेळी संबंधित मुख्याध्यापक व संचालकांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news