पिंपरी : लग्नापूर्वी प्री-वेंडिग शूट करण्याची क्रेझ असताना आता पोस्ट वेडिंग शूटलाही पसंती मिळत आहे. लग्नापूर्वी प्री-वेडिंग शूटसाठी खास विविध ठिकाणे निवडली जातात. तर, लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनी सुटी घेऊन पोस्ट वेडिंग शूटही केले जात आहे. त्याशिवाय, वयाच्या चाळिशी किंवा पन्नाशीत असलेल्या जोडप्यांकडूनही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शूट करून घेतले जात आहे. प्री-वेडिंग शूटची क्रेझ गेल्या काही वर्षांपासून आली आहे. आता दिमाखदार विवाह सोहळ्यापूर्वी लाखभर रुपये खर्च करून हमखास प्री-वेडिंग शूट करून घेण्याकडे विवाह इच्छुक जोडप्यांचा कल वाढला आहे.
त्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, गुजरात अशा विविध ठिकाणी बनविलेल्या तयार सेटवर फोटोग्राफी आणि व्हिडिओ बनविले जातात. लग्नाच्या वेळी हे फोटो आणि व्हिडिओ लावले जातात. छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर म्हणाले की, प्री-वेडिंग शूटची सध्या क्रेझ आहे. त्याचप्रमाणे, ज्यांना प्री-वेडिंग शूट शक्य होत नाही ते लग्नानंतर दोन ते तीन महिन्यांना खास सुट्या काढून पोस्ट वेडिंग शूट करून घेतात. तर, काही जोडपी वयाच्या चाळिशीत आणि पन्नाशीतदेखील छायाचित्रे आणि व्हिडिओ काढून घेतात.
छायाचित्रे, व्हिडिओ अन् रील्स
ज्या जोडप्यांना लग्नापूर्वी प्री-वेडिंग शूट करता येत नाही अशी जोडपी लग्न झाल्यानंतर खास सुट्या काढून पुढील 2 ते 3 महिन्यांत पोस्ट वेडिंग शूट करून घेतात. त्या माध्यमातून चांगली छायाचित्रे, व्हिडिओ, रील्स बनविली जातात. तसेच, वयाची 40 आणि 50 वर्ष पुर्ण केलेल्या जोडप्यांकडून खास लग्नाच्या वाढदिवसानिमित्त छायाचित्रण आणि व्हिडिओ शूटींग करून घेतले जाते.
हेही वाचा