लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 77 अधिकार्‍यांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 77 अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा उपजिल्हाधिकारी संवर्गातील 41 आणि तहसीलदार संवर्गातील 36 अशा एकूण 77 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात पुण्यातील तहसीलदार, उपजिल्हाधिकार्‍यांचा समावेश आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातून पुणे जिह्यातून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरिक्षक (संगणक) अभिषेक देशमुख यांची सातारा येथील भूसंपादन क्रमांक 4 येथे रामहरी भोसले यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर बदली करण्यात आली आहे, तर भोसले यांना पुणे राजशिष्टाचार विभागात मनोज खैरनार यांच्या जागेवर पदस्थापना देण्यात आली आहे.

तर, खैरनार यांची तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदली करून त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची लातूर येथे सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारीपदी, सुरेखा माने यांची पुणे भूसंपादन (क्र.11) अधिकारीपदी, भूसंपादन अधिकारी (क्र.1) प्रवीण साळुंखे यांची सातारा येथे भूसंपादन (क्र. 21) अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या जागी बदली करण्यात आली, तर साळुंखे यांच्या बदलीने रिक्त जागेवर मुंबई सामान्य प्रशासन विभागाचे कल्याण पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यातील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सुप्रिया डांगे यांची नागपूर येथील पेंच प्रकल्पाधिकारी, अशा बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे जिह्यातील तहसीलदार संवर्गामधून हवेलीच्या (शहर) राधिका हावळ बारटक्के यांची स्थावर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ ता. माळशिरस, सोलापूर येथे, गृह शाखेचे धनंजय जाधव यांची मुंबई उपनगर येथे, कुकडी प्रकल्पाचे सहायक पुनर्वसन विभागातील अभय चव्हाण यांची मुलुंड उपनगर येथील रिक्त पदावर, तर चव्हाण यांच्या जागी इचलकरंजीचे अपर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, वेल्हा तहसीलदार या रिक्त असलेल्या जागी निवास ढाणे यांची बदली झाली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news