Mumbai-Pune highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीत बदल

Mumbai-Pune highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीत बदल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील वेहेरगांव, कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव यात्रा सुरू होत आहे. यात्रा कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जड, अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केला आहे.

वेहेरगाव, कार्ला येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कार्ला फाटा ते श्री एकवीरा देवी पायथा मंदिरादरम्यान 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण वेळ जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. 21 ते 23 ऑक्टोबर या 3 दिवसांच्या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा-कुसगाव बुद्रुक टोलनाका-वडगाव फाटामार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करून ती खंडाळा – कुसगाव टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरून पुणे बाजूकडे जातील.

21 ते 23 ऑक्टोबर या 3 दिवसांच्या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वडगाव तळेगाव फाटा – लोणावळा – मुंबई बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करून ती तळेगाव फाटा येथून उर्से खिंड, उर्से टोलनाकामार्गे नवीन द्रुतगती मार्गावरून मुंबई बाजूकडे वळविली जाईल. नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news