शिवजयंतीला मध्य भागात वाहतूक बदल : असा असेल बदल

शिवजयंतीला मध्य भागात वाहतूक बदल : असा असेल बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती श्रीशिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील मध्यभागात 19 फेब्रुवारी रोजी (सोमवारी) वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवजयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात येतात. त्यामुळे प्रामुख्याने बाजीराव रस्ता, कुमठेकर, केळकर व इतर रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

जिजामाता चौक येथून शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणार्‍या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक ते टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जावे. गणेश रस्ता-दारूवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक-दारूवाला पुल चौकातून वाहचाल कांना इच्छित स्थळी जाता येईल. केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकमार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.

मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोडवरील वाहने संत कबीर चौक समर्थ विभाग हद्दीतून वळविण्यात येतील. पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणारे वाहनचालक पुरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छित स्थळी जातील. मिरवणुका सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटका बुरूजकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.

मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरून बालगंधर्व बाजूकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छित स्थळी जातील. मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहनांना शनिवारवाड्याकडे जाता येणार नाही. या वाहचालकांनी कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पूल ते बालगंधर्व, टिळक पूलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेलीमार्गे इच्छित स्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणार्‍या वाहनचालकांना स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी
चौक डावीकडे वळून इच्छित स्थळी जाता येईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news